मुंबई : डाळिंब हे खूप फायदेशीर फळ (Beneficial fruit) आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढते. डाळिंब तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते. हे तुमच्या शरीराला आजारांशी लढण्याची शक्ती देखील देते. रोगप्रतिकारशक्ती वाढवून ते अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करते. डाळिंब (Pomegranate) या फळात असे काही गुणधर्म आहेत, जे तुमच्या शरिराला शक्ती प्रदान करुन व्यक्तीला रेागमुक्तीकडे नेतात. त्या सेाबतच या डाळींबाला लैंगिक आयुष्यातही (Even in sex life) अनन्य साधारण महत्व आहे. कामजिवन सुखर आणि आनंदी करण्यासाठी डाळींबाला वरदान मानले गेले आहे. जर पुरूष लैंगिक समस्येने त्रस्त असेल, तर तुम्ही डाळिंब या फळाची मदत घेऊ शकता. बरेच लोक दररोज डाळिंब खातात, परंतु चांगल्या परिणामांसाठी डाळिंब हे फळ नेमके कधी आणि कसे खावे याला जास्त महत्त्व आहे. जाणून घ्या, डाळिंब कधी खावे, जेणेकरून तुमचे वैवाहीक आयुष्य सुखकर होईल.
आरोग्य शास्त्रानुसार असे मानले जाते की, रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब दाणे चावुन-चावुन खावे. हे प्रजनन आणि लैंगिक आरेाग्य सुधारण्यास खुप फायदेशीर आहे. आहार आणि आरेाग्य तज्ञांच्या मते, डाळिंबात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म प्रचुर मात्रेत आढळून येतात, जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल, ताण-तणावाचे दुष्परीणाम कमी करायचे असतील तर, डाळिंब खाण्यास प्राधान्य द्यावे. त्याच प्रमाणे जर तुम्हाला तुमचे लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब निश्चीतच खावे.
डाळिंबात 6 ग्रॅम फायबर, 2.5 ग्रॅम प्रथिने, दैनंदिन गरजेच्या 29 टक्के व्हिटॅमिन सी आणि 35 टक्के व्हिटॅमिन के आणि 16 टक्के फोलेट असते. इतकेच नाही तर रोजच्या गरजेच्या किमान ११ टक्के पोटॅशियम आणि सुमारे २२ ग्रॅम साखर म्हणजे १४० कॅलरीज. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की डाळिंबात ग्रीन टी किंवा इतर कोणत्याही पेयापेक्षा तिप्पट अँटीऑक्सिडंट असतात.
वैवाहीक आयुष्य सुखकर करण्यासाठी तुम्ही आले किंवा कच्चा कांदाही खाऊ शकता. आले खाल्ल्याने तुमच्या अनेक समस्याही दूर होतील. तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्याची ताकद यात आहे असे मानले जाते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन तुमच्या शरीरात कामुकता वाढवण्याचे काम करतो. चांगल्या लैंगिक जिवनासाठी आवश्यक हार्मोन आहे. याशिवाय कच्चा कांदाही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जेवणासोबत आपण सहज खात असलेला कांदा आपल्या लैंगिक आयुष्याला फार पुरक आहे. याची कुणाला कल्पनाही नसेल. तर आजच आपल्या आहारात कांदा समाविष्ट करा.