मुंबई : दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला (Krishna Janmashtami 2023) खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णजन्माची विशेष तयारी केली जाते. अनेकांच्या घरी पिढ्या नं पिढ्या हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातोय. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या रात्री 12 वाजता झाला होता, त्यामुळे रात्री बारा वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. मथुरा-वृंदावनात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे विशेष वैभव पाहायला मिळते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तिथीबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक दरवर्षी जन्माष्टमी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. एका दिवशी गृहस्थ जन्माष्टमी साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव पंथाचे. अशा परिस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. सर्वसामान्य 6 सप्टेंबरला आणि 7 सप्टेंबरला वैष्णव पंथ जन्माष्टमी साजरे करतील. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री 12 वाजता झाला होता.
6 सप्टेंबर 2023 दुपारी 03.27 पासून भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी सुरू होते
कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी समाप्त – 7 सप्टेंबर 2023 दुपारी 04.14 वाजता
रोहिणी नक्षत्र – 6 सप्टेंबर रोजी सकाळी 09.20 ते 7 सप्टेंबर रोजी 10.25 वा.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी यशोदा नंदनची विधिवत पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. तर दुसरीकडे ज्या जोडप्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी बाल गोपाळाची पूजा करावी. तसेच त्यांना लोणी, दही, दूध, खीर, पेढे अर्पण करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)