Sushmita Sen | सुष्मिता सेनला वडिलांच्या संपत्तीतून मिळणार नाही एकही रुपया; ‘हे’ मोठं कारण समोर

| Updated on: Sep 13, 2023 | 12:55 PM

सुष्मिताने तिच्या आयुष्यात असेही काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे तिला तिच्या कुटुंबीयांकडून आणि समाजाकडूनही विरोध झाला. मात्र नंतर तिच्या याच निर्णयाचं कौतुकसुद्धा झालं. हा निर्णय म्हणजे लग्न न करताच मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय.

Sushmita Sen | सुष्मिता सेनला वडिलांच्या संपत्तीतून मिळणार नाही एकही रुपया; हे मोठं कारण समोर
Sushmita Sen
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकल्यानंतर अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये तिने काही सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या सुष्मिताच्या करिअरची सेकंड इनिंग सुरू आहे. ‘आर्या’ नंतर आता ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये तिने दमदार काम केलंय. तिची ही सीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सुष्मिताने तिच्या आयुष्यात असेही काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे तिला तिच्या कुटुंबीयांकडून आणि समाजाकडूनही विरोध झाला. मात्र नंतर तिच्या याच निर्णयाचं कौतुकसुद्धा झालं. हा निर्णय म्हणजे लग्न न करताच मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय. तिच्या याच निर्णयामुळे सुष्मिताला वडिलांच्या संपत्तीतून एक रुपयाही मिळणार नाही. खुद्द सुष्मिताने याविषयीचा खुलासा केला आहे.

सुष्मिता म्हणाली, “मिस युनिव्हर्सचं कर्तव्य म्हणून मी अनेकदा अनाथाश्रमांना भेट द्यायची. तेव्हा मला जाणवलं की असी बरीच मुलं आहेत ज्यांना आईची गरज आहे. त्यावेळी मी ठरवलं होतं की मला मूल दत्तक घ्यायचं आहे. पण माझा हा निर्णय आईला मान्य नव्हता. ती माझ्यावर चिडली. तेव्हा माझ्या वडिलांनी मला विचारलं, तुला मूल दत्तक का घ्यायचं आहे? मी म्हटलं की त्याबद्दल माझ्या मनात ठामपणे त्याविषयी भावना निर्माण झाली आहे. त्यावर ते म्हणाले की तू हे काही वर्षांनंतरही करू शकतेस. तेव्हा मी त्यांना विचारलं की, जर माझं लग्न झालं आणि माझ्या पार्टनरने या निर्णयाला नकार दिला तर काय करू? मला कोणालाच उत्तर द्यायचं नाही. त्यानंतर त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला.”

हे सुद्धा वाचा

“कायद्यानुसार, मूल दत्तक घेताना वडिलांच्या संपत्तीचा अर्धा भाग हा त्या मुलाच्या नावे करावा लागतो. जर तुम्हाला वडील नसतील तर एखादी वयस्कर व्यक्ती त्याठिकाणी असावी लागते. हे काम करणारी माझ्या वडिलांपेक्षा उत्तम व्यक्ती आणखी कोण असू शकते? माझ्या वडिलांनी अर्धी नाही तर त्यांची संपूर्ण संपत्ती मी दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावे केली. भारतासारख्या देशात मी अशा वडिलांची मुलगी असल्याचा मला खपू अभिमान आहे. त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी जे केलं, ते अविश्वसनीय आहे”, अशा शब्दांत सुष्मिता व्यक्त झाली.