Suhana Khan हिचं यश पाहून शाहरुख खान याला वाटेल गर्व; किंग खानच्या लेकीचा सर्वत्र बोलबाला

| Updated on: Sep 13, 2023 | 12:54 PM

Suhana Khan | 'तो' दिवस शाहरुख खान याच्यासाठी असेल खास... लेकीचं यश पाहून किंग खान वाटतो अभिमान... किंग खानच्या लेकीचा सर्वत्र बोलबाला... सध्या सर्वत्र सुहाना खान हिची चर्चा...

Suhana Khan हिचं यश पाहून शाहरुख खान याला वाटेल गर्व; किंग खानच्या लेकीचा सर्वत्र बोलबाला
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेता शाहरुख खान कायम त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि मुलांबद्दल सांगत असतो. किंग खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान यांनी त्यांच्या करियरला सुरुवात केली आहे. सध्या किंग खान याची लेक सुहाना हिची चर्चा जोर धरत आहे. बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींच्या यादीत असावं अशी सुहाना हिची इच्छा आहे. सुहाना दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यामातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुहाना हिचा पहिला सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित देखील होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. ७ डिसेंबर रोजी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ही दिवस किंग खानसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

सुहाना वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात लेकीला अभिनय करताना पाहून किंग खान याला देखील अभिमान वाटेल.. सुहाना खान हिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट तर ७ डिसेंबर रोजी ‘द अर्चिस’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

 

सुहाना खान, महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातू अगस्त्या नंदा, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुहाना हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सिनेमातील संपूर्ण स्टारकास्ट दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सिनेमातील स्टारकास्ट मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.

 

‘द अर्चिस’ सिनेमात सुहाना, अगस्त्य आणि खुशी कपूर यांच्यासोबतच मिहिर आहुजा, वेदांग रैना, आदिती डॉट आणि युवराज मेंडा सारखे कलाकार देखील दिसणार आहेत. सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना १९६० चा काळ अनुभवता येणार आहे. सिनेमाची कथा मैत्री, स्वातंत्र्य, प्रेम, वाद, हार्टब्रेक यासारख्या गोष्टींभोवती फिरताना दिसत आहे.

‘द अर्चिस’ सिनेमानंतर सुहाना बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमात देखील झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  सुहाना हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सुहाना हिची ओळख अभिनेत्री म्हणून झाली नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील सुहाना हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.