Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीचा ‘या’ व्यक्तीला किस; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘आता याचा नंबर’

| Updated on: Sep 13, 2023 | 12:55 PM

रियाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये ती पूलच्या जवळ बसून एका मुलाला गालावर किस करताना दिसतेय. पहिल्या फोटोमध्ये तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती त्याला किस करताना पहायला मिळतेय.

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीचा या व्यक्तीला किस; फोटो पाहून नेटकरी म्हणाले आता याचा नंबर
Rhea Chakraborty
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘जलेबी’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या अफेअरमुळेच सर्वाधिक चर्चेत आली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रियावर अनेक आरोप झाले होते. याप्रकरणी तिला मुख्य आरोपी मानलं जात होतं. सुशांतच्या कुटुंबीयांनीही रियावर गंभीर आरोप केले होते. इतकंच नव्हे तर ड्रग्ज प्रकरणात तिला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटकसुद्धा झाली होती. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर दोघांची जामिनावर सुटका झाली. आता दोघंही आपापल्या करिअरमध्ये पुढे जात आहेत. नुकताच रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरून तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय.

रियाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये ती पूलच्या जवळ बसून एका मुलाला गालावर किस करताना दिसतेय. पहिल्या फोटोमध्ये तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती त्याला किस करताना पहायला मिळतेय. या फोटोंवरून रियाला नेटकरी ट्रोल करू लागले आहेत. ‘आता याचा नंबर आहे वाटतं’, असा टोमणा एकाने मारला. तर ‘सुशांतचा जीव घेऊन हिचं मन भरलं नाही वाटतं’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. कमेंट बॉक्समध्ये काहीजण रियाची बाजू घेत आहेत. ‘फोटोतील तरुण हा रियाचा भाऊ शोविक आहे’, असं नेटकऱ्यांनी ट्रोलर्सना म्हटलं आहे. भाऊ शोविकच्या वाढदिवसानिमित्त रियाने हे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत टॅगसुद्धा केलं आहे. मात्र अनेकांना शोविक कोण हे माहीत नसल्याने त्यांनी रियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

सुशांतच्या प्रकरणानंतर रिया दोन वर्षे माध्यमांपासून दूरच होती. काही दिवसांपूर्वी ती ‘एमटीव्ही रोडीज’द्वारे पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाली. एमटीव्ही रोडीजमध्ये ती गँग लीडर बनून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 14 जून 2020 रोजी सुशांत मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या निधनानंतर रियावर बरेच आरोप झाले होते. तिला मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला होता. रियावर सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचा, मनी लाँड्रिंग आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. अटकेनंतर जवळपास महिनाभर ती तुरुंगात होती.