मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री प्रिती झिंटा आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पती आणि जुळ्या मुलांसोबत अभिनेत्री परदेशात राहत आहे. प्रिती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रिती हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण एका असा होता, जेव्हा प्रिती फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत होती. बॉलिवूडच्या ‘डिंपल गर्ल’चं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज प्रिती झिंटा हिच्या लव्हलाईफबद्दल जाणून घेवू…
ब्रेट ली – प्रीती झिंटा हिचं नाव ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीसोबत जोडले गेलं आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी अनेक महिने एकमेकांना डेट केल, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण प्रिती हिने कधीच ब्रेट लीसोबत असलेलं नातं मान्य केलं.
युवराज सिंग – भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर खेळाडू युवराज सिंग याच्यासोबत देखील प्रीती झिंटाचं नाव जोडले गेलं होते. युवराज हा प्रितीच्या टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू आहे. दरम्यान, दोघांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या. पण दोघांनी देखील नात्याचा स्वीकार केला नाही.
नेस वाडिया – नेस वाडिया एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. नेस वाडिया आणि प्रिती झिंटा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण २००९ मध्ये दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला.
शेखर कपूर – प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक शेखर कपूर यांनी प्रिती झिंटा हिला डेट केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांच्या रिलेशनशिप चर्चांना बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. रिपोर्टनुसार, प्रिती हिच्यावर शेखर कपूर यांचा संसार मोडल्याचे देखील आरोप करण्यात आलं. पण रंगणाऱ्या सर्व चर्चांना प्रितीने अफवा असल्याचं सांगितलं आहे.
जीन गुडइनफ – प्रिती झिंटा हिने जीन गुडइनफ याला देखील डेट केलं आहे. जीन आणि प्रिती यांच्यामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 28 फेब्रुवारी 2015 रोजी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर प्रिती पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. तिला जुळी मुलं देखील आहेत.