Ileana D’Cruz: विवाहित आहे इलियाना डिक्रुझ? ‘या’ मिस्ट्री मॅनसोबत केलय लग्न, काय आहे सत्य?

| Updated on: Aug 06, 2023 | 11:16 AM

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने जोडीदाराचा फोटो पोस्ट तर केला होता; पण 'तो' मिस्ट्री मॅन कोण? अखेर नाव समोर... सध्या सर्वत्र इलियाना डिक्रुझ हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Ileana D’Cruz: विवाहित आहे इलियाना डिक्रुझ? या मिस्ट्री मॅनसोबत केलय लग्न, काय आहे सत्य?
Follow us on

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने लेकाचा पहिल्या फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या सर्वत्र इलियाना आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. इलियाना हिने १ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. दरम्यान, लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं. इलियाना हिने बाळाच्या वडिलांबद्द अद्यापही मौन बाळगलं आहे. पण इलियानाने तिच्या गरोदरपणात सोशल मीडियावर जोडीदाराचा फोटो पोस्ट करत कौतुक केले होतं. आता इलियाना विवाहित असल्याची माहिती मिळत आहे. ज्यामुळे सर्वत्र इलियाना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, इलियाना हिने १३ मे रोजी लग्न केलं आहे. तिच्या पतीतं नाव मायकल डोलन असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचं ठिकाण व इतर गोष्टींबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकेलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरी इलियाना हिने नवरीच्या वेशातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या आजू-बाजूला फुलांची सजावट केल्याचं देखील समोर आलं होतं.

पण अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो लग्नातील होता की, अभिनेत्रीचं फोटोशूट होतं याबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही. मायकलबद्दल बोलताना असा दावा करण्यात आला होता की, अभिनेत्री गेल्या एक वर्षापासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. तिने अनेकदा जोडीदारासोबत फोटो देखील पोस्ट केला.

पहिल्यांदा आई झाल्यानंतर आनंत व्यक्त करत इलियाना म्हणाली, ‘आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपूरे आहेत. मुलाचं जगात स्वागत केल्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत…’ असं अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

एवढंच नाही तर, इलियाना डिक्रूझने तिच्या मुलाच्या नावची देखील घोषणा केली आहे. इलियाना हिने तिच्या बाळाचं नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असं ठेवलं आहे. इलियानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. सध्या सर्वत्र इलियाना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

इलियाना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इलियाना हिने अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘बर्फी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता बॉलिवूडपासून दूर असली तर, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.