मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री काजोल हिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील काजोल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोल हिने स्वतःची ओळख निर्माण केली. वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कजोल हिच्याकडे गजगंज संपत्ती आहे. काजोल तिच्या रॉयल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सध्या काजोल हिचं शिक्षण, बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा प्रवास, संपत्ती यांची चर्चा रंगत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे. काजोल हिचा आज वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
काजोल हिने ‘बेखुदी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘बाजीगर’, ‘डीडीएलजे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. ९० च्या दशकातील अभिनेत्रींच्या यादीत काजोल अव्वल स्थानी होती.
काजोल हिने वयाच्या १६ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीचं शालेय शिक्षण देखील पूर्ण होवू शकलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काजोल कधी कॉलेजमध्येच गेली नाही. एकापाठोपाठ अनेक सिनेमे साईन केल्यामुळे काजोल हिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं नाही. पण बॉलिवूडमध्ये मात्र काजोल हिने भरपूर यश मिळवलं. आज काजोलला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कजोल हिच्याकडे गजगंज संपत्ती आहे. मीडिया रिपोर्टनुसार २०२१ पर्यंत अभिनेत्रीकडे तब्बल १८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. पण यंदाच्या वर्षातील अभिनेत्रीच्या संपत्ती आकडा अद्याप समोर आलेला नाही. एवढंच नाही तर, काजोल हिच्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर काजोल हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीने ‘द ट्रायल’ सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल हिच्यासोबत जिशू सेनगुप्ता, अली खान, शीबा चड्ढा, कुब्रा सेत यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
एवढंच नाही तर, काजोल कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काजोल पती आणि अभिनेता अजय देवगन याच्यासोबत देखील अनेक ठिकाणी दिसते. काजोल आणि अजय यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. काजोल आणि अजय यांची मुलगी निसा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. निसा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.