Charu Asopa On Weight Loss : अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) ही टीव्हीवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. मात्र गेल्या काही काळापासून ती कामामुळे नव्हे तर तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत होती. चारू ही एक वर्किंग मॉम (working mom) असून गेल्या काही दिवसांपासून ती ‘कैसा है ये रिश्ता अंजनासा’ शोमध्ये बिजी आहे. तर दुसरीकडे ती तिची छोटी, लाडकी लेक जियाना हिची काळजी घेण्यातही व्यस्त आहे.
2019 साली चारूने अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ, राजीव सेन याच्याशी लग्न केले. मात्र काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. त्याचदरम्यान 2021 मध्ये चारूने मुलीला जन्म दिला. त्यानंतरही राजीव व चारूमध्ये खटके उडतच होते. अखेर या वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. या सगळ्यामुळे ती कामापासून दूर होती. अखेर तिने पु्न्हा काम शोधण्यास सुरूवात केली, मात्र डिलीव्हरीनंतर वाढलेल्या वजनामुळे तिला नव्या समस्यांचा सामना करावा लागला. त्याबद्दल तिने नुकतेच मौन सोडले आहे.
बाळाच्या जन्मानंतर सेलिब्रिटी मॉमना काम मिळणं होतं कठीण
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारूने इंडस्ट्रीतलं धक्कादायक वास्तव शेअर केलं. महिला सेलिब्रिटींनी मुलांना जन् दिल्यावर, त्यांनी लगेच वजन कमी करावं, अशी अपेक्षा केली जाते. त्यानंतरच त्यांना काम मिळू शकतं. हे खरं आहे, तुमच्या शरीरावर प्रेग्नन्सी फॅट दिसत असेल तर लोक तुम्हाला कामाची ऑफर देत नाहीत, अशा शब्दांत चारूने इथलं सत्य सांगितलं.
वजन वाढल्यामुळे सहन करावा लागला होता त्रास
मुलीला जन्म दिल्यानंतर वजन वाढल्याने आपल्याला काम शोधण्यास आणि चांगलं काम मिळण्यास बराच त्रास सहन करावा लागला, असे चारूने नमूद केले. सुरूवातीला राजीवपासून वेगळी झाल्यावर, मला लवकरात लवकर काम करायचं होत. ऑडिशन आणि मीटिंगसाठी गेल्यावर सांगण्यात आलं की, माझं वजन खूप जास्त आहे. चेहऱ्यावरही खूप फॅट आहे. रोज भरपूर व्यायाम करा आणि पुन्हा शेपमध्ये या, असा सल्लाही देण्यात आल्याचं चारून सांगितलं.
मला माझ्या गरजा आहेत, खर्च आहेत, त्यासाठी मला काम हवं होतं. म्हणून मी कडक डाएट आणि वर्कआऊट रूटीन फॉलो केलं. शूटिंग करताना मी जेवायचे नाही. कधी-कधी काही स्पेसिफिक कपडे फिट बसावेत म्हणून मी पाणीही प्यायचे नाही, असा अनुभवही चारूने कथन केला.
मुलीच्या जन्मानंतर वाढलेले वजन मला हळूहळू कमी करायचे होते पण माझ्याकडे (वेळेची) लग्झरी नव्हती, त्यामुळे मी कडक डाएट फॉलो केले, असे चारूने सांगितले.