मुंबई : गायक सोनू निगम (Sonu Nigam) याच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची मोठी बातमी समोर आलीय. चेंबूरमधील एका कार्यक्रमात सोनू निगमवर धक्काबुक्की करण्यात आली. सेल्फी काढण्यावरुन वाद झाल्याने ही धक्काबुक्की करण्यात आल्याची चर्चा आहे. संबंधित घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु झालाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलीस लवकरच याबाबत सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे. याशिवाय सोनू निगम यांच्याकडूनही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात येण्याची शक्यता आहे.
आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकांशी सेल्फी घेण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आलीय. सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती त्यावेळी स्वप्नील फातर्पेकर हेही तिथे होते. या गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षसोबत किरकोळ धक्काबुकीं झाल्यानंतर स्वप्नील यांनीदेखील एका अंगरक्षकाला धक्का दिला त्यावरन हा वाद झाल्याचं समोर येतंय. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोनू निगमला इजा झाली नसल्याचं पोलिसांच म्हणणं आहे.
संबंधित घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु झालाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे सेलिब्रेटींवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी बुधवारी 15 फेब्रुवारीला मुंबईत एका पबमध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर देखील हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला होता.
पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांच इंफ्लुएंसर सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत फोटो काढण्यावरुन वाद भांडण झालं होतं. हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. पबच्या बाहेर पृथ्वी स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपी मुलीच्या हातून बेसबॉलची बॅट काढून घेताना दिसला होता.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पृथ्वी आणि त्याच्या मित्रांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. 8 लोकांनी मिळून गाडीवर हल्ला केला व मारहाणीचा प्रयत्न केला असा आरोप आहे. पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर इंफ्लुएंसर सपना गिलला पोलिसांनी अटक केली.