Raksha Bandhan: अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला; बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराजपेक्षाही कमी कमाई

| Updated on: Aug 12, 2022 | 10:54 AM

सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होऊनसुद्धा या चित्रपटाने पहिल्या दिवशी फार कमी कमाई (Box Office Collection) केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा लाला केदारनाथ या एका दुकान मालकाच्या भूमिकेत आहे, ज्याने स्वत: लग्न करण्यापूर्वी आपल्या चार बहिणींचं लग्न करण्याची शपथ घेतलेली असते.

Raksha Bandhan: अक्षयच्या रक्षाबंधनने पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला; बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराजपेक्षाही कमी कमाई
Raksha Bandhan Movie
Image Credit source: Instagram
Follow us on

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होऊनसुद्धा या चित्रपटाने पहिल्या दिवशी फार कमी कमाई (Box Office Collection) केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा लाला केदारनाथ या एका दुकान मालकाच्या भूमिकेत आहे, ज्याने स्वत: लग्न करण्यापूर्वी आपल्या चार बहिणींचं लग्न करण्याची शपथ घेतलेली असते. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकरने अक्षयच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. तर सादिया खतीब, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहजमीन कौर या चित्रपटात अक्षयच्या बहिणीच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.

‘बॉक्स ऑफिस इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रक्षाबंधन या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 7.5 ते 8 कोटींचा गल्ला जमवला आहे. अक्षयचा हा चित्रपट आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’सोबत प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या चित्रपटानेही पहिल्या दिवशी जेमतेमच कमाई केली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ने पहिल्या दिवशी जवळपास 10 ते 11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रक्षाबंधन हा या वर्षातील अक्षयचा तिसरा चित्रपट आहे. याआधी त्याचे बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

हे सुद्धा वाचा

रक्षाबंधन या चित्रपटाने अक्षयच्या बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज या चित्रपटांपेक्षाही कमी कमाईने सुरुवात केली आहे. बच्चन पांडेनं पहिल्या दिवशी 13.25 कोटी रुपये कमावले होते. तर सम्राट पृथ्वीराजची पहिल्या दिवसाची कमाई 10.07 कोटी रुपये झाली होती. त्यामुळे आता वीकेंडला या चित्रपटाची कमाई किती होते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा, रक्षाबंधन आणि जन्माष्टमी यांसारख्या सुट्ट्या लागोपाठ येऊनसुद्धा जर कमाई फारशी होऊ शकली नाही, तर बॉलिवूड चित्रपटांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, हे नक्की!