ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy) रुग्णालयात दाखल केल्याची सोमवारी जोरदार चर्चा होती. या चर्चांनंतर खुद्द धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ‘आया सावन झूम के’ या त्यांच्याच चित्रपटातील एक गाणंसुद्धा त्यांनी या व्हिडीओमध्ये गायलं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मी ठीक आहे, असं ते म्हणाले. “हॅलो फ्रेंड्स, सकारात्मक रहा, सकारात्मक विचार करा, तुमचं आयुष्य सकारात्मक होईल. मैं चुप हूँ, बिमार नहीं (मी गप्प आहे, आजारी नाही). असो, काही चर्चा होत असतात, अफवा पसरत असतात. ते माझं गाणं होतं ना, त्याप्रमाणे मी म्हणेन, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत कहो (वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका). काळजी घ्या, एकमेकांशी प्रेमाने वागा. आयुष्य खूप सुंदर आहे”, असं ते चाहत्यांना म्हणाले.
धर्मेंद्र यांनी घरातूनच हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘तुम्हीच असंच खूश आणि सकारात्मक रहा’, असं एकाने म्हटलं. तर काहींनी त्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी घेण्याची विनंती केली. धर्मेंद्र हा व्हिडीओ पोस्ट करण्याआधी त्यांच्या मुलांनीही अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या बाबांची प्रकृती ठणठणीत आहे. ते बरे आहेत”, असं सनी देओल म्हणाला. तर “बाबा घरी असून त्यांची तब्येत ठीक आहे. तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद. पण अशा अफवा पसरवणाऱ्यांबद्दल मला वाईट वाटतं”, अशी प्रतिक्रिया बॉबी देओलने दिली.
मे महिन्यात धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. व्यायाम करताना अचानक पाठीत दुखू लागल्याने त्यांना मे महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. “