मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून आगामी ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘जवान’ सिनेमाला सुपरहिट करण्यासाठी किंग खान प्रचंड मेहनत घेत आहे. वर्षाच्या सुरुवातील शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. ‘पठाण’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सिनेमा बॅन करण्याची मागणी केली.
सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सर्वत्र वातावरण तापलं होतं. पण होणाऱ्या विरोधाचा कोणताच परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला नाही. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली आणि सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली.
आता ‘पठाण’ सिनेमाला हिट करण्यासाठी वापरलेली ट्रिक शाहरुख खान ‘जवान’ सिनेमासाठी देखील अवलंबणार का? अशी चर्चा रंगत आहे. शाहरुख खान याने पठाण सिनेमासाठी कोणतीही मुलाखत दिली नव्हती. सिनेमाचं प्रमोशन देखील अभिनेत्याने केलं नव्हतं. पण आता मिळत असलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाचं प्रमोशन करणार आहे.
रिपोर्टनुसार, ‘जवान’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी काही इव्हेंट देखील आयोजित करण्यात आले आहेत. पण या इव्हेंटमध्ये प्रश्न – उत्तरांचं सेशन नसणार आहे. पण शाहरुख इव्हेंट दरम्यान मज्जा-मस्ती करताना दिसणार आहे. एवढंच नाही तर, शाहरुख खान आस्क एसआरके सेशनच्या माध्यामातून ट्विटरवर चाहत्यांच्या संपर्कात राहणार आहे. सिनेमाला हीट करण्यासाठी आस्क एसआरके सेशन अभिनेत्याला लाभदायक ठरतो.
आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून शाहरुख खान याला देखील चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतं. आता ‘पठाण’ सिनेमाप्रमाणे प्रेक्षक किंग खानच्या ‘जवान’ सिनेमाला किती प्रेम देतात आणि सिनेमाची किती कमाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
‘जवान’ सिनेमातील पहिलं गाणं जिंदा बंदा प्रदर्शित झालं आहे. सिनेमातील पहिल्या गाण्याचा बोलबाला सोशल मीडियावर सर्वत्र दिसून येत असून, दुसरं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि नयनतारा रोमान्स करताना दिसणार आहेत.
‘जवान’ सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’ सिनेमातील किंग खानला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.