मणिपूर – आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात मतदान (Voting) होत आहे. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं असल्याच पाहायला मिळत आहे. आज तिथं 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज होणा-या मतदानासाठी मणिपूरमध्ये 1247 मतदान केंद्र तयार कऱण्यात आले आहेत. तिथं आज सकाळपासून मतदार मतदान करीत आहेत. तसेच निवडणुक आयोगाकडून (election commission) मतदान केंद्रांना पुर्णपणे सुरक्षा देण्यात आली आहे. आजच्या दुस-या टप्प्यात अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करतील.
47.16% voters turnout recorded till 1 pm in the second phase of #ManipurElections2022 pic.twitter.com/YhL6KN0161
— ANI (@ANI) March 5, 2022
कोणी मारली गोळी ?
मणिपूरमधल्या करोंग मतदार संघात सकाळी मतदान सुरु असताना गोळी चालवली गेली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. करोंगमधल्या एका भाजपच्या उमेदवाराने सुरक्षा रक्षकांनी गोळी चालवल्याने युवकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. पण सुरक्षा रक्षकांनी का गोळी चालवली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ज्यावेळी तिथं गोळी चालवण्यात आली त्यावेळी तिथं घबराहट पसरली होती. तरूणानं असं कोणतं कृत्य केलं की त्याला गोळी मारली. त्या केंद्रावरती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तिथं तणावाचे वातावरण असल्याचे समजते.
28.19% voters turnout recorded till 11 am in the second phase of #ManipurElections2022 pic.twitter.com/5Kxl1Obcqj
— ANI (@ANI) March 5, 2022
आज मणिपूरमध्ये अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावणार
आज मणिपूरमध्ये अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावणार असल्याच पाहायला मिळतंय. त्यामध्ये मणिपुरचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले O Ibobi Singh, उपमुख्यमंत्री Gaikhangam Gangmei यांच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. दोन्ही मोठे नेते काँग्रेसच्या तिकीटावरती निवडणुक लढवणार असल्याचे पाहायला मिळत आहे. आज Thoubal, Chandel, Ukhrul, Senapati, Tamenglong आणि Jiribam या भागात मतदान होणार असून एकूण 8.38 मतदान आहे. आज भाजपचे 22 उमेदवार, काँग्रेसचे 18 उमेदवार, एनपीपीचे 11 उमेदवार नागा पीपल फ्रंडचे 10 उमेदवार मैदानात आहे. सगळ्या माझा विजय होईल असा दावा केला आहे.
#ManipurElections2022 | People queue up to cast votes at a polling station in Thoubal district
“Unemployment is the main issue. We’re voting for more opportunities,” said young voters pic.twitter.com/fiU8NRslZ8
— ANI (@ANI) March 5, 2022