पणजी : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly election Result) रंगतदार लढत पणजीत (Panaji) पाहायला मिळाली. दिवंंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांचा पणजीतून पराभव झाला. पण कडवी झुंज दिलेल्या उत्पल पर्रिकर यांनी पराभूत झाल्यानंतर भाजपला थेट टोला लगावला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना उत्पल पर्रिकरांनी (Utpal Parrikar) आपल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपचा सिम्बॉल माझ्याकडे असता तर मी कुठच्या कुठे गेलो असतो’, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाय. ‘भाजपमध्ये नसलेल्या माणसाला तिकीट दिलं. माझी क्षमता जास्त आहे. मला गोव्यानं चांगला पाठिंबा दिला. त्याबाबत लोकांना भेटून त्यांचे आभार मानणार आहे’ असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर पुन्हा भाजपासाठी काम करणार का?, भाजपात जाणार का?, यावरही त्यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना ‘ ह्या तांत्रिक गोष्टी आहेत, त्या हळूहळू सॉर्टआऊट होतील’, असं उत्पल यांनी म्हटलंय.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर उत्पल पर्रिकर यांना भाजपनं पणजी सोडून इतर दोन जागांचीही ऑफल दिली होती. मात्र ही ऑफर नाकारत उत्पल यांनी पणजीतून निवडणूक लढण्याचा आपला निर्धार कायम असल्याचं म्हटलं होतं.
या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्पल पर्रिकर यांची निवडणुकीतली कामगिरी कशी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र या निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपचे उमेदवार आणि पणजीत ज्यांचं निर्विवाद वर्चस्व आहे असं म्हटलं जातं, त्या बाबुश मॉन्सेरात यांचा विजय झाला.
बाबुश यांना पणजी मतदारसंघात उत्पल यांनी कडवी झुंज दिली होती. बाबुश यांचा 6787 इतकी मतं मिळाली. तर उत्पल यांनी 6071 इतकी मतं मिळाली. अवघ्या काही मतांच्या फरकानं उत्पल यांचा पराभव झाल्यानंतर उत्पल यांनी आपल्या विचारांमुळे मतं आपल्याला मिळाली, असं त्यांनी म्हटलंय. आमदार व्हायचा माझा मुद्दा कधीच नव्हता, असंही त्यांनी म्हटलंय. भाजपमध्ये नसलेल्या माणसाला उमेदवारी दिल्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
गोव्यात भाजपनं 2022च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता कायम राखत 20 जागांवर दणदणित विजय मिळवलाय. तर आपचे दोन उमेदवार गोव्यात निवडून आलेत. भाजपपाठोपाठ काँग्रेस दोन नंबरचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. काँग्रेसचे 11 उमेदवार निवडणून आलेत. तीन अपक्ष, मगोचे दोन, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्स या पक्षांचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप 2022मध्ये गोव्यात सरकार स्थानप करणार आहे.
गोवा भाजपमध्ये सुंदोपसुंदी; मुख्यमंत्री सावंतांविरोधात आमदार राणेंनी थोपटले दंड, प्रकरण काय?
गोव्यात फडणवीसांच्या भूमिकेला रवी नाईकांचा खो, महाराष्ट्र गोमंतकला सोबत घेण्यास विरोध, काय घडतंय?
Goa Assembly Election | 4 बायका 4 नवरे, निवडणुकीत एकत्र उतरले! तिघे जिंकले, कोण हरले?