नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : सध्या आयआयटी, एनआयटी आणि ट्रीपल आयटी शैक्षणिक संस्थांमध्ये बीटेक प्रवेशासाठी काऊन्सिलींग केली जात आहे. तर दुसरीकडे या कॉलेजात अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत आहे. यंदा प्लेसमेंटमध्ये एक नवीन रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. यंदा अहलाबाद आयआयआयटी मधील बीटेकचा विद्यार्थी अनुराग मकाडे याला एमेझॉन कंपनीने तब्बल 1.25 कोटीचं तगडं पॅकेज दिले आहे.
अनुराग मकाडे हा विद्यार्थी मूळचा नाशिकचा आहे. त्याला डबलिनमधील दिग्गज ई – कॉमर्स कंपनी एमॅझोनमध्ये फ्रंटएंड इंजिनिअर म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनुराग याने अलाहाबाद येथील आयआयआयटी मधून बीटेक केले आहे. त्याने त्याला मिळालेल्या या जॉब ऑफरबाबत सोशल मिडीयावर घोषणा केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की नमस्कार मित्रानो मला हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की एमॅझोनच्या फ्रंटएंड इंजिनिअर म्हणून मी रुजू होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनुराग मकाडे याला मिळालेली तगडी ऑफर पाहता. बाजारात विशेष तज्ज्ञांची गरज आहे. कारण कोणत्याही कंपनीला उंचीवर नेण्यासाठी खास तज्ज्ञांची गरज असते. तसेच प्रमुख कंपन्यांना सेवा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडेही योग्य नेतृत्वाची क्षमतेची आवश्यकता हवी. अनुरागचा हा प्रवास अन्य विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायी आहे. जर तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर तुम्हाला पारखणारा या इंडस्ट्रीजमध्ये आहेच. मात्र, तुम्ही प्रयत्न करण्याची गरज आहे. मग तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आड कोणी येऊ शकत नाही.
अनुराग मकाडे शिवाय प्रथम प्रकाश गुप्ता याला गुगलकडून 1.4 कोटीचे पॅकेज मिळाले आहे. पलक मित्तल देखील 1 कोटी रुपयाचे एमॅझोनचे पॅकेज मिळाले आहे. अखिल सिंह याला रुब्रिकमध्ये 1.2 कोटी रुपयाच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे.