भंडारा : शक्तीवर्धक गोळ्याचा चुकीच्या पद्धतीने वापर सुरु असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अनेकांचा मृत्यू झाल्यानंतरही अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत. भंडारा (bhandara crime news) जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पोलिस (bhandara police) प्रशासन चांगलचं जागं झालं आहे. शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनानं तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. भंडारा इथल्या लॉजवर मैत्रिणीसोबत काल रात्री घालवायची असल्यामुळे त्या तरुणाने “व्हियाग्रा” नावाच्या गोळ्या घेतल्या असल्याचं पोलिसांनी प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा शवविच्छेदन अहवाल (postmortem report) आल्यानंतर नेमकं कशामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला हे स्पष्ट होईल.
ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो नागपूरचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका मुलीशी त्याची मैत्री झाली. त्याचं मोबाईलवरती बोलणं वाढल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.त्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या, त्यांची अनेकदा भंडारा जिल्ह्यात भेट होत होती. विशेष म्हणजे दोघांची ओळख दोन महिन्यापूर्वी झाली होती. त्या तरुणीसोबत रात्र घालवायची असल्यामुळे त्याने शक्तीवर्धक गोळ्यांचं अतिसेवन केलं होतं.
भंडारा इथल्या लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना घटना घडली आहे. तरुणानं “वायग्रा” या गोळ्यांचं शक्तिवर्धकासाठी अतिसेवन केलं आणि त्यात तरुणाचा रक्तदाब वाढल्यानं हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. मृतक तरुण 27 वर्षीय आहे, तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची एका ठिकाणी भेट झाली.
शक्तीवर्धक गोळ्याचं अतिसेवन केल्यानं तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला, तरुणाचं अंग थंडगार पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेली त्याची मैत्रीण घाबरुन गेली. मैत्रिणीनं लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. शवविच्छेदन अहवालाची पोलिस वाट पाहत असून त्यानंतर तपासाची दिशा ठरेल. त्याचबरोबर त्या तरुणाच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह देण्यात येणार आहे.
ही घटना घडल्यापासून या तरुणांना झालंय तरी काय अशी चर्चा सुरु झाली आहे.