Kalyan Crime : कोरोना काळात नोकरी गेली, मग दोघा मित्रांनी नवा धंदा सुरु केला, पण…

| Updated on: Aug 28, 2023 | 2:14 PM

नोकरी गेल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यामुळे दोघा मित्रांनी मिळून नवीन धंदा करायचं ठरवलं आणि सुरु केलाही. पण हा धंदा त्यांना महागात पडला आहे.

Kalyan Crime : कोरोना काळात नोकरी गेली, मग दोघा मित्रांनी नवा धंदा सुरु केला, पण...
प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या दोघांना अटक
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण / 28 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये चोरीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. दोघे मित्र एकत्र नोकरीही करायचे. पण कोरोना महामारीमुळे दोघांचीही नोकरी गेली. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मग दोघांनी मिळून चोरीचा धंदा करायचे ठरवले आणि दोघे सराईत चोरटे बनले. एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरुन पसार व्हायचे. अखेर दोघांनाही मुंबई गुन्हे शाखा युनिट 3 ने हेरलेच. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 6 मोबाईल असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला जातो. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनेश गणपत निनावे आणि संतोष प्रसन्नकुमार चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

गेले काही दिवस एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवाशांच्या बॅगा लंपास होण्याच्या घटना वाढल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात 9 ऑगस्ट रोजी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली होती. बॅगेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. याबाबत प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.

मुंबई पोलीस आयुक्त लोहमार्ग रवींद्र शिसवे, पोलीस उप आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश चिंचकर, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कल्याण युनिट येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, पोलीस अंमलदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुलेकर, अजय रौंधळ, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता बसावे, महेंद्र कर्डिले, रविंद्र ठाकूर, अजित माने, अजीम इनामदार, सोनाली पाटील, गोरख सुरवसे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे यांनी प्रकरणाचा तपास सुर केला.

हे सुद्धा वाचा

कल्याण स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासत त्या सीसीटीव्हीच्या आधारे कल्याणमधून दिनेश गणपत निनावे आणि संतोष प्रसन्न कुमार चौधरी या दोघांना सापळा रचत ताब्यात घेतले. या दोघांकडून पाच गुन्ह्यांची उखल करत 4,14,499 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.