संदीप शिंदे , माढा, सोलापूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रचंड उकाडा असल्यामुळे लोक पोहण्याला पसंती देत आहेत. मात्र पोहोताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, माढा तालुक्यातील सीना नदी (Sina River) पात्रात पोहोयला गेलेल्या एका सरकारी डॉक्टरचा (Government Doctor) बुडून मृत्यू झालाय. डॉ. रेहान आरिफ सय्यद (वय – 26) असं या तरुण डॉक्टरचं नाव होतं. ते मुळचे इंदापूरचे रहिवासी होते. कुर्डुवाडी पोलिसांत (Kurdwadi Police) या प्रकराची नोंद करण्यात आलीय. डॉ. रेहान हे सुट्टीनिमित्त कुटुंबियांसोबत कुटुंबियांसोबत त्यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे यांच्याकडे माढा तालुक्यातील म्हैसगाव इथल्या शेतात आले होते. गावातीलच सीना नदीच्या पात्रात रेहान, अमन आणि जिब्रान हे तिघे भाऊ पोहण्यासाठी गेले आणि तिथेच डॉ. रेहान यांचा बुडून मृत्यू झाला.
डॉ. रेहान सय्यद हे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर होते. ते सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबियांसोबत वडिलांचे मित्र संजय सरोदे यांच्या माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील शेतात आले होते. त्यावेळी गावातीलच सीना नदी पात्रात रेहान, अमन आणि जिब्रान हे तिघे भाऊ पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना रेहान बंधाऱ्याच्या दाराजवळ पोहोचले. बंधाऱ्याच्या दाराच्या दिशेनं पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांना पुन्हा काठावर येता आलं नाही. त्यांनी काठावर परत येण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, थकल्यामुळे ते पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. रेहान यांच्या दोन भावांनी त्यांना पाण्याबाहेर काढले आणि कुर्डुवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सोलापूर जिल्ह्यातील मार्डी गावात जानेवारीमध्ये अशीच एक घटना घडली होती. शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा तळ्यात बडून मृत्यू झाला होता. सानिका गरड (17), पूजा गरड (13), आकांक्षा वडजे (11) अशी त्यांची नावं होती. मार्डी गावात राहणाऱ्या सानिका, पूजा, आकांक्षा या तिघी जणी दुपारी 1 च्या सुमारास रानात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जळण गोळा करत असताना त्यांना खूप तहान लागली. म्हणून त्या जवळच असलेल्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेल्या. पिण्या पिण्यासाठी तळ्यावर गेल्या असता त्यांचा पाय घसरला आणि तिघीही पाण्यात पडल्या. तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.