Pune Suicide | मी आत्महत्या करायला जातोय, उच्च मधुमेहाला कंटाळून पुण्यात तरुणाने संपवलं आयुष्य

| Updated on: May 09, 2022 | 9:22 AM

आजारपणाला कंटाळून गणेश मनिकम याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हा प्रकार घडला. गणेशला उच्च मधुमेह आजाराने ग्रासले होते. हाय डायबिटीजमुळे तो वैतागल्याचंही बोललं जातं.

Pune Suicide | मी आत्महत्या करायला जातोय, उच्च मधुमेहाला कंटाळून पुण्यात तरुणाने संपवलं आयुष्य
पुण्यात तरुणाची आत्महत्या
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

पुणे : आजारपणाला कंटाळून युवकाने मृ्त्यूला कवटाळल्याची (Youth Suicide) घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात (Pune Crime News) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च मधुमेह आजाराला (High Diabetes) कंटाळून त्याने आयुष्याची अखेर केल्याचा आरोप आहे. गणेश मनिकम असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या काही दिवसांपासून गणेश बेपत्ता होता.

काय आहे प्रकरण?

गणेश मनिकम बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी नोंदवली होती. गणेशने घरातून जात असताना मी आत्महत्या करायला जात आहे, असं म्हटलंही होतं. त्यावरून पोलिसांनी गणेशने आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे. अमरजाई देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला.

उच्च मधुमेहाच्या आजाराने त्रस्त

आजारपणाला कंटाळून गणेश मनिकम याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हा प्रकार घडला. गणेशला उच्च मधुमेह आजाराने ग्रासले होते. हाय डायबिटीजमुळे तो वैतागल्याचंही बोललं जातं. गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमरजाई देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला.

हे सुद्धा वाचा

एका बातमीदरा मार्फत देहूरोड पोलीस स्टेशनला एक अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अमर जाई देवी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस डोंगराच्या पायथ्याशी झाडाला लटकून आहे अशी बातमी मिळताच देहूरोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. शहानिशा केली असता वयाचा अंदाजाने त्याचप्रमाणे कपड्यांचा रंगावरून हा इसम बेपत्ता असलेला 42 वर्षीय गणेश मनिकम आहे असा अंदाज वर्तवला. मात्र पोलिसांनी गणेश मनिकम याच्या घरच्यांना फोन करून मृतदेहाची शहानिशा करण्यासाठी बोलावलं असता घरच्यांनी या गोष्टीची पुरती केली की हा गणेश मनिकम आहे.

मी आत्महत्या करायला जात आहे

गणेश मनिकम हा 42 वर्षीय युवक देहू रोड गांधी नगर येथील राहणारा असून मागील काही दिवसांपासून तो घरातून बेपत्ता होता त्याची बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये 22 एप्रिल ला नोंदविण्यात आली आहे, गणेश याला हाय शुगर चा आजार होता व या आजाराला व त्याच्या त्रासाला कंटाळून तो घरातून निघून गेला होता निघून जात असताना गाईच्या वासरु बांधणारी रशी तो सोबत घेऊन गेला होता व मी आत्महत्या करायला चाललो आहे असं घरच्यांना बोलून गेला होता पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झाला नाही आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा शव बेपत्ता गणेश मनिकम याचाच आहे असं कन्फर्म झाला