नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon News) तालुका शेतकऱ्याच्या आत्महत्येनं हादरलाय. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या (Maharashtra Farmer Suicide News) केली. मालेगावातील नांदगावच्या बाणगाव बुद्रूक इथं ही घटना घडली. राहत्या घरातच शेतकऱ्यानं गळफास लावून घेतला आणि जीव दिला. या शेतकऱ्यांवर दोन लाख रुपयांचं कर्ज होतं, अशी माहितीसमोर आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लाख रुपयांचं कर्ज कसं फेडायचं, या विवंचनेत शेतकरी होता. त्यातून त्याने अखेर प्रचंड तणावाखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याचं सांगितलं जातंय. जनार्दन कवडे असं या शेतकऱ्याचं (Maharashtra Farmers) नाव आहे. जनार्दन यांच्या आत्महत्येमुळे कवडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर आणखी एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांतली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही चिंताजनक आहे.
नापिकी, अवकाळी पाऊस, पिकाला मिळणारा भाव, अशा एक ना अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील गरीब शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे इंधनाचे दर, वाढती महागाई, या सगळ्याचाही मार शेतकऱ्याला बसलतोय. दुहेरी फटका बसलेल्या शेतकऱ्यावर आधीच कर्जाचा भार असताना कर्ज फेडायचं? संसाराचा गाडा हाकायचा? की शेतीवर लक्ष केंद्रीत करायचं? असा प्रश्न पडलाय. त्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची गेल्या महिन्याभरातली आकडेवारीही काळजी करायला लावणारी आहे.
गेल्या 23 दिवसांत महाराष्ट्रामध्ये तब्बल 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद, बीड आणि यवतमाळमध्ये झाल्या आहेत. कोणत्या काळात नेमक्या किती आत्महत्या झाल्या आहेत, त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे :
1 जानेवारी ते जून 2022 –