Wardha Murder : वर्ध्यात मजुराचा धारदार शस्त्राने वार करत खून! पैशांच्या वादातून हॉटेल मालकानेच रचला हत्येचा कट?

| Updated on: Aug 17, 2022 | 10:36 AM

Wardha crime news : अमोल पद्माकर मसराम असं हत्या करण्यात आलेल्या मजुराचं नाव आहे. या मजुराचं वय कळू शकलेलं नाही. या मजुराचा मृतदेह वर्ध्यातील जुनापाणी चौक परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर आढळून आला होता. इथंच त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Wardha Murder : वर्ध्यात मजुराचा धारदार शस्त्राने वार करत खून! पैशांच्या वादातून हॉटेल मालकानेच रचला हत्येचा कट?
वर्ध्यात मजुराची हत्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वर्धा : वर्ध्यात एका मजुराची हत्या (Wardha Murder News) करण्यात आली. धारदार शस्त्राने सपासप वार करुन मजुराचा खून करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांना (Wardha Crime News) ताब्यातही घेतलं आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत आहेत. पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. वर्ध्यातून जुनापाणी चौक परिसरातील उड्डाणपुलावर एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. सकाळच्या वेळी काही लोकांना मृतदेह (Dead body) असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसानी दिली. अखेर पोलिसांच्या तपासातून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आणि मृत व्यक्तीच्या कुटुबीयांनाही याबाबत कळवण्यात आलं. अखेर हा मृतदेह एका मजुराचा असल्याचं उघड झाल्यानंतर या व्यक्तीही हत्या करण्यात आली असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नातलगांनी केलेल्या आरोपांवरुन एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मजुरावर धारदार शस्त्राने सपासप वार

अमोल पद्माकर मसराम असं हत्या करण्यात आलेल्या मजुराचं नाव आहे. या मजुराचं वय कळू शकलेलं नाही. या मजुराचा मृतदेह वर्ध्यातील जुनापाणी चौक परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर आढळून आला होता. इथंच त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अमोर हा एका हॉटेलात मजुरीचं काम करत होता.

ज्या हॉटेलात तो काम करायचा, तिथल्या हॉटेल मालकाने त्याची हत्या केली, असा आरोप अमोल याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अमोलच्या हत्येचं वृत्त कळल्यानं मसराम कुटुंबीयांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता. अमोलच्या हत्येमुळे मसराम कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

हे सुद्धा वाचा

संशियाताची चौकशी सुरु

रिंगरोड लगतच्या कारला चौकातील एस.एम हॉटेलात अमोल मजुरीचं काम करत होता. हे हॉटेल महेश मसराम चालवत होते. महेश मसराम यांच्याकडे अमोलल नेहमी मजुरीचे पैसे मागत होता. त्यावरुन वाद होऊन अमोलची धारदार शस्त्राने महेशने हत्या केली, असा संशय अमोलच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी महेश मसरामला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून महेश मसराम यांची कसून चौकशी सुरु आहे. आता पोलिसांच्या पुढील तपासातून या हत्याप्रकरणी अधिक खुलासे काय होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.