भंडारा : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून एका कुटुंबाने शेजाऱ्याचा जीव (Murder) घेतला. भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (Bhandara Crime) मानेगांव बाजार येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गायीला धुतल्यानंतर (Cow) आवारात पाणी आल्यावरुन भांडण झालं होतं. त्यानंतर शेजाऱ्यांनी ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप आहे. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेला वाद इतका विकोपाला गेला की मते पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी महादेव बोंदरे, त्यांची पत्नी आणि मुलगा दिनेशला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात बोंदरे कुटुंब गंभीर जखमी झाले. लाकडी दांड्याने वार करत तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपी कुटुंबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गाय रस्त्यावर धुणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. गायीला धुतल्यानंतर आपल्या आवारात पाणी आल्याच्या क्षुल्लक कारणाने झालेल्या भांडणात शेजाऱ्यांनी दुसऱ्या शेजाऱ्यांची लाकडी दांड्याने वार करत हत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलिस हद्दीतील मानेगांव बाजार येथे घडली आहे. या प्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून आरोपी कुटुंबाला अटक करण्यात आली आहे.
मानेगांव बाजार येथील मते आणि बोंदरे कुटुंब शेजारी राहत असून त्यांचा सुरुवातीपासून क्षुल्लक कारणांवरुन वाद होत होता. काल संध्याकाळी महादेव बोंदरे हे आपल्या गाईला घरासमोरील रस्त्यावर धुत होते. गाय धूत असताना त्याचे पाणी मते यांच्या घरातील आवारात आल्याने चंद्रशेखर मते यांचे महादेव बोंदरे यांच्याशी भांडण झाले.
वाद इतका विकोपाला गेला की मते पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी महादेव बोंदरे, त्यांची पत्नी आणि मुलगा दिनेशला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात बोंदरे कुटुंब गंभीर जखमी झाले. याची माहिती कारधा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी जखमी बोंदरे कुटुंबाला उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान जखमी महादेव बोंदरे यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर मते आणि त्यांची पत्नी आणि दोन मुलांच्या विरुद्ध कलम 302, 307, 323, 506 आणि 34 अन्वये गुन्हा नोंद करत चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर क्षुल्लक कारण किती मोठा विध्वंस घडवू शकतो, याची प्रचिती मिळाली आहे. कारधा पोलिस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक
रेकॉर्डवरील 40 गुन्हेगार ताब्यात, बियाणींच्या मर्डरनंतर नांदेड पोलिसांची झाडाझडती
नातेवाईकाच्या लग्नात किरकोळ कारणावरुन वाद, नांदेडमध्ये मित्राकडून तरुणाची हत्या