गडचिरोली : एका इंजिनिअरचा स्फोटात गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू (Gadchiroli Blast in Power Plant) झालाय. ही घटना देसाईगंज वडसा (Desaiganj Vadasa) येथील एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये घडली. पहाटेच्या सुमारास एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये जबर स्फोट झाला. या स्फोटात इंजिनिअरसह एक मजूर गंभीर जखमी (Gadchiroli Accidnet News) झाले होते. दरम्यान, इंजिनिअरवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
एए एनर्जी थर्मल पॉवर प्लांटमध्ये प्रॉडक्शन लाईनची पाहणी करण्यासाठी संजय सिंग हा अभियंता एका मजुरासह गेला होता. ते पाहणी करत असतेवेळीच स्टीम लाईनचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे संजय सिंग यांच्यासह मजूरही गंभीररीच्या जखमी झाला होता.
गंभीर जखमी अवस्थेतील दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहाटोच्या वेळी घडलेल्या या स्फोटानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात इंजिनिअर संजय सिंग आणि मजूर यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.
दुर्दैवाची बाब म्हणजे उपचारादरम्यान, संजय सिंग या इंजिनिअरची मृत्यूशी सुरु झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यानच संजय यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे. संजय यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयानाही मोठा धक्का बसला आहे. तर जखमी मजुरावर अजूनही उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटामध्ये थर्मल प्लांटमधील सामग्रीचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. या स्फोटानंतर पॉवर प्लांट परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर स्फोटाचा आवाजानं संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. नेमका हा स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.