महाराष्ट्रात विषबाधा होऊन मृत्यू (Death Due to poisoned food) होण्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या विरारमध्ये (Virar News) धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा सख्ख्या भावांचा अकाली मृत्यू (Sibling Dead in Virar) झाला. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे या मुलांची तब्बेत खालावली होती. त्यांना आधी उलटी झाली. त्यामुळे त्यांना डॉक्टरांना दाखवण्यात आलं. त्यांना स्थानिक जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथं त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. या मुलांच्या मृत्यूचं कारणावरुन नेमकं विषबाधाच आहे की आणखी काही, यावरुन शंका व्यक्त केली जातेय. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आठ आणि नऊ वर्षांच्या मुलाच्या पोटात दुखू लागला. त्याआधी रात्री अकरा वाजता या दोघांनी आपल्या इतर भावंडांसोबत आणि आईवडिलांसोबत डाळभात खाल्ला होता. पण अचानक मध्यरात्री मुलांना पोटत दुखायला लागलं आणि त्यांनी उलटी केली. तब्बेत खालावत असल्यानं आईवडिलांना काळजी वाटली. त्यांनी मुलांना डॉक्टरांना दाखवण्यासाठी सिविल हॉस्पिटल गाठलं. पण त्यानंतर काही वेळाच्या उपचारानंतर मुलांचा जीव गेला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अशफाक खान, हे विवारमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करतात. ते आपल्या पत्नी आणि पाच मुलांसह विरारमध्ये वास्तव्यास आहेत. अशफाक यांच्या पत्नीनं शुक्रवारी रात्री डाळ आणि भात असं जेवणं केलं होतं. संपूर्ण कुटुंबाने रात्री जेवणं केलं आणि ते झोपी गेले.
पण याच कुटुंबातील आठ वर्षांची फरहीफ आणि नऊ वर्षांचा असिर पोट दुखतंय म्हणून मध्यरात्री झोपेतून उठले. त्यांनी आईवडिलांनाही पोटात दुखत असल्याचं सांगितलं. तर इतर तीन मुलांना आई-वडिलांना पोटदुखीचं काहीच लक्षण नव्हतं.
दरम्यान, आसिफ आणि फरहिफने उलटी केली आणि त्यांची तब्बेत आणखीनच खालावू लागली. अशफाक खान यांना आणि त्यांच्या पत्नीला चिंत वाटू लागली. त्यांनी मध्यरात्री एका डॉक्टरला दोघा मुलांच्या प्रकृतीबाबत सांगितलं. डॉक्टरांनी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत सांगितलं. आईवडिल रातोरात आपल्या मुलांना घेऊन रुग्णालयात पोहोचले.
पहाटे साडेचार वाजता मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सिविल्ह रुग्णालयात या मुलांवर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मुलांच्या मृत्यूचं बातमी कळता आईवडिलांना मोठा धक्काच बसला. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने आता विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. तर खान कुटुंबीयांवरही मोठा आघात झालाय.