मुंबई / 24 ऑगस्ट 2023 : पश्चिम रेल्वेवरवरील वांद्रे टर्मिनसमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क टीटीई लॉबीमध्ये दारु पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. तीन टीसींना टीटीई लॉबीमध्ये दारु पिताना रंगेहाथ पकडण्यात आले. समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) अशी तिघांची नावे आहेत. तिघेही बडोदा विभागातील टीटीई आहेत. तिघांनाही निलंबित करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या टर्मिनसमध्ये ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम विनीत अभिषेक यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अभिषेक हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे अचानक तपासणी करताना अभिषेक हे टीटीई लॉबीमध्ये गेले. टीटीई लॉबीमध्ये बडोदा विभागातील तीन टीटीई दारु पित असल्याचे उघडकीस आले. तीन टीसी रेल्वेच्या आवारातच मद्यप्राशन करताना रंगेहाथ पकडले.
बुधवारी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे टर्मिनसच्या TTE लॉबीची पाहणी केली. यावेळी समीर मकवाना (उपमुख्य तिकीट निरीक्षक), विनय देशमुख (मुख्य तिकीट निरीक्षक) आणि भावेश पटेल (मुख्य तिकीट निरीक्षक) यांना रंगेहाथ पकडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तिन्ही टीसींवर निलंबनाची कारवाई केली आहे.