Yavatmal Crime : बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज येत नव्हता, घरचे पहायला गेले तर..

| Updated on: Aug 15, 2023 | 11:08 PM

दोन मुलांसह आई आतल्या खोलीत होती. बराच वेळ आवाज नाही म्हणून घरते पहायला गेले. समोरील दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला.

Yavatmal Crime : बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज येत नव्हता, घरचे पहायला गेले तर..
यवतमाळमध्ये सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले
Follow us on

यवतमाळ / 15 ऑगस्ट 2023 : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन मुलांसह आईने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. रेशमा मुडे असे मयत महिलेचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना पैशासाठी घडल्याचे कळते. सासरच्या मंडळींनी रुग्णालयातून पोबारा केला. माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरुन सासू, सासरे आणि पतीविरोधात बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वी मृत्यू

मयत रेशमा दोन मुलांसह आतल्या खोलीत होती. सायंकाळी घरचे पहायला गेले तर दोन मुलांसह रेशमाने विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ रेशमाला आणि दोन मुलांना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र आई आणि मुलाचा मृत्यू झाला होता. तर मुलगी अत्यावस्थ अवस्थेत होती. तिला पुसद येथील उपजिल्हा रेफर करण्यात आले आहे.

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच महिलेच्या माहेरचे लोक तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. माहेरचे लोक येताच सासरच्यांनी तेथून पळ काढला. यानंतर महिलेचे वडील वसंता राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्यांविरोधात कलम 306, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरचे माहेरुन पैसे आणण्यासाठी मुलीचा छळ करत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा