Kalyan Crime : कल्याणमध्ये सोसायटीची सुरक्षा रामभरोसे; सोसायटीत सुरक्षा करण्याऐवजी रक्षक गाढ झोपेत, डिलिव्हरी बॉयने संधी साधली अन्..

| Updated on: Aug 26, 2023 | 3:41 PM

रहिवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सुरक्षारक्षकालाच लुटल्याची घटना कल्यणमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kalyan Crime : कल्याणमध्ये सोसायटीची सुरक्षा रामभरोसे; सोसायटीत सुरक्षा करण्याऐवजी रक्षक गाढ झोपेत, डिलिव्हरी बॉयने संधी साधली अन्..
कल्याणमध्ये ऑनड्युटी सुरक्षारक्षकालाच गंडा
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण / 26 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. दिवसाढवळ्याही घरफोड्या होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असतानाच कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चक्क इमारतीच्या सुरक्षारक्षकालाच लुटल्याची घटना कल्याणमधील गौरीपाडा परिसरात घडली आहे. सुरक्षारक्षक झोपेत असल्याचा फायदा घेत इमारतीत पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने त्याचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

काय आहे प्रकरण?

कल्याण गौरीपाडा परिसरातील एका सोसायटीत एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला होता. यावेळी ड्युटीवर तैनात असलेला सुरक्षारक्षक गाढ झोपेत होता. डिलिव्हरी बॉयने हीच संधी साधली आणि सुरक्षारक्षकाच्या खिशातील मोबाईल काढून घेत पोबारा केला. ही सर्व सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.

सुरक्षारक्षक अशा प्रकारे ड्युटीवर झोपा काढत असतील तर इमारतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. घरफोडी, दरोड्याच्या घटना टाळण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्या इमारतीत सुरक्षारक्षक तैनात करतात. मात्र सुरक्षारक्षक असे झोपेत असतील तर रहिवाशांनी कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही अद्याप पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

हे सुद्धा वाचा