Dombivali Crime : किरकोळ वादातून गोविंदा पथकावर हल्ला, हल्ल्यात एक गोविंदा गंभीर जखमी

| Updated on: Aug 21, 2023 | 9:34 AM

कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचे प्रयत्न सतत सुरु असतात. क्षुल्लक कारणातून वाद करुन हल्ला करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. अशीच एक घटना गोविंदा पथकासोबत घडली आहे.

Dombivali Crime : किरकोळ वादातून गोविंदा पथकावर हल्ला, हल्ल्यात एक गोविंदा गंभीर जखमी
क्षुल्लक वादातून गोविंदा पथकावर हल्ला
Follow us on

डोंबिवली / 21 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. रोज काही ना काही कारणातून हल्ले, मारामाऱ्या होत असतात. सध्या गोकुळाष्टमी सण जवळ आला आहे. त्यामुळे गोविंदा पथक दहीहंडीची जोरदार तयारी करत आहेत. मात्र दहीहंडीचा सराव करत असताना गोविंदा पथकावर काही तरुणांकडून हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एक गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमी गोविंदाच्या फिर्यादीवरुन रामनगर पोलिसांकडून तिघांवरिोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

डोंबिवलीतील आयरे भागात असलेल्या बालाडी गार्डन गृहसंकुलासमोर गोविंदा पथकाचा सराव सुरु होता. यावेळी चार तरुण तेथे आले आणि त्यांनी गोविंदा पथकाशी वाद घातला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला. मग या वादातून गोविंदा पथकातील सदस्यांना ठोसा-बुक्क्यांनी मारहाण केली. एकाने स्टीलच्या कड्याने अल्पवयीन गोविंदाच्या डोक्यात फटका मारला. यात सदर गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी गोविंदाला पाहून चौकडी तेथून पळून गेली. रामनगर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फौजदार नंदकिशोर काते फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. खुलेआम घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा