डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivali crime news) एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांना धक्का बसला आहे. एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातून भर रस्त्यात मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोराला एका तरुणाने धाडस दाखवत पाठलाग करून पकडलं. त्यानंतर काही लोकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या (dombivali police) ताब्यात दिलं. त्या तरुणाचं नाव नितीन ठाकरे असं आहे. चोरट्याने ऑनलाइन रमी सर्कलवर (online rummy Circle game) गेम खेळून त्यात कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी चोरीचा मार्ग निवडल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. सध्या विष्णू नगर पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे.
७० वर्षीय वयोवृद्ध महिला सुवर्णा नेवगी बाजारात गेल्या होत्या, त्यावेळी खरेदी झाल्यानंतर त्या आपल्या घरी निघाल्या होती. त्यादरम्यान त्यांच्याबाजूने चोरटा घुसमटत होता. निर्जनस्थळी कोणीचं नसल्याचं पाहिल्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यात असलेलं मंगळसुत्र हिसकावलं. त्यावेळी त्या महिलेनं आरडाओरड केली.
हा सगळा प्रकार त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्वेश राऊत नावाच्या तरुणाने बघितला. सर्वेशने धाडस दाखवत त्या चोरट्याचा पाठलाग सुरू केला होता. काही अंतरावर गेल्यानंतर त्या तरुणाला सर्वेशने पकडलं. तिथल्या काही लोकांच्या मदतीने त्याला चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
विष्णूकर पोलिसांनी त्याची विचारपूस केली, त्याचं नाव नितीन ठाकरे आहे. तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर नितीन ठाकरे याला रमी सर्कलवर गेम खेळण्याची सवय असून खेळात जिंकण्याच्या अपेक्षांमध्ये त्यांने लोकांकडून कर्ज घेतले आहे.
घेतलेले कर्ज कसे फेडायचे या भीतीपोटी त्या हा मार्ग निवडला असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहे. ऑनलाइन गेममुळे लोकांवर काय परिणाम होतो ? याचं जिवंत उदाहरण कल्याण मधून दिसून आले आहे.