सिगरेटचे झुरके, नववधूची फ्लाइंग किस, नवऱ्याचा गुदमरला जीव आणि…

| Updated on: Jul 09, 2023 | 8:07 PM

नववधूच्या घरी पोहोचल्यावर नवरदेवाची स्वागत करण्याचा विधी सुरु होता. नवरदेवाच्या सासूबाई त्याला ओवाळण्यासाठी आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. पण, त्यांचा सतत तोल जात होता. त्या थकल्या असाव्यात असे समजून नवरदेवाकडील मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केले.

सिगरेटचे झुरके, नववधूची फ्लाइंग किस, नवऱ्याचा गुदमरला जीव आणि...
Image Credit source: प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

उत्तर प्रदेश : आपली पत्नी सालस, सुसंकृत असावी अशी प्रत्येक नवरदेवाची इच्छा असते. त्याचप्रमाणे आपला नवराही निर्व्यसनी असावा, रुबाबदार आणि सान्गला कमावता असावा अशी वधूची इच्छा असते. अनेकदा अशी काही नाती जुळून येतात. पण, काही जुळून आलेली नाती लग्नामध्ये हुंडा मागितला या कारणावरून लग्न तुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अशी एक विचित्र घटना घडली. लग्नामध्ये डीजेवर डान्स सुरु होता. मात्र, त्या दोघींच्या वागण्यामुळे आलेले वरात घेऊन आलेले नवरदेवाकडील मंडळी लाजत होते.

हयातनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायतीन येथे ही घटना घडली आहे. येथील एका तरुणाचे गवाना शहरातील एका तरुणीशी लग्न ठरले. लग्नाच्या दिवशी ठरलेल्या वेळेनुसार वऱ्हाडी मंडळी नववधूच्या गावी पोहोचली. मोठ्या थाटामाटात वराकडील मंडळी नाचत, गात नववधूच्या दारात पोहोचले.

हे सुद्धा वाचा

नववधूच्या घरी पोहोचल्यावर नवरदेवाची स्वागत करण्याचा विधी सुरु होता. नवरदेवाच्या सासूबाई त्याला ओवाळण्यासाठी आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. पण, त्यांचा सतत तोल जात होता. त्या थकल्या असाव्यात असे समजून नवरदेवाकडील मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढील कार्यक्रम सुरु झाला.

लग्न विधी सुरु झाला, नवरीमुलगी लग्न मंडपात आली. दरम्यान तिथे डीजे सुरु होता. नवरीमुलगी नाचतच लग्न मंडपात आली आणि येतानाच ती लग्नाला आलेल्या सर्वाना स्टेजवरूनच फ्लाइंग किस देऊ लागली. या प्रकाराने नवरदेव गोंधळला.

तर, इकडे तोल जाणाऱ्या सासूबाई लग्न मंडपातच डीजेच्या तालावर थरकु लागल्या. अचानक तिने एक सिगारेट पेटवली, तोंडात घातली आणि धुराचे वर्तुळ सोडू लागली. एकीकडे नवरी मुलगी फ्लाइंग किस देतेय आणि इकडे सासूबाई नशेत टूल्ल होऊन कश पे कश मारत असल्याचे पाहून नवऱ्याचे होश उडाले.

नवरदेवाला या सगळ्या प्रकाराची लाज वाटू लागली आणि त्याने लग्नाला नकार दिला. झाल्या प्रकारामुळे लग्नमंडपात एकच गदारोळ झाला. वऱ्हाडी मंडळी आल्या पावली परत निघाली. वधूची आई आणि वधूच्या या कृतीमुळे लग्न मोडल्यास वराकडील लोकांनी सांगितले.

वधूची आई दारूच्या नशेत होती, असा आरोप नवरदेवाच्या वडिलांनी केला आहे. ती इतकी नशेत होती की तिला आरतीचे ताटही धरता येत नव्हते. मुलीच्या पालकांच्या सांगण्यावरून दोन्ही बाजूचा खर्चही उचलला होता. मात्र, हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर हे नाते तोडावेच लागले असे त्यांनी सांगितले.