भंडारा : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेसंदर्भात (Bhandara Gang Rape Case) पोलिसांनी पहिल्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली होती. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी 12 पथक तयार केले असून 200 पोलीस कर्मचारी या पथकात तैनात आहेत.या घटनेतील पिडीतेसोबत तिची वैद्यकीय अवस्था पूर्णपणे बरी नसल्यामुळे पोलिसांचे (Police) बोलणे झालेले नाही, अथवा तिचा जबाबही नोंदवण्यात आलेला नाही. प्रकरणाच्या तपासात आणखी आरोपींचा सहभाग समोर आल्यास त्यांनाही अटक केली जाईल. शिवाय या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते, असे संकेत पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यात घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येताना दिसतोय.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटने संदर्भात पोलिसांनी पहिल्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली होती. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी 12 पथक तयार केले असून 200 पोलीस कर्मचारी या पथकात तैनात आहेत.
भंडारा जिल्ह्यात घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. या अत्याचारामुळे पीडित महिलेला तीव्र जखमा आणि प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या महिलेवर अत्याचार केला होता. तर अत्याचारानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
सामाजिक आणि राजकीय अशा विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. महिला अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीत. नराधमांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही नुकतीच पीडित महिलेची नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी बोलून विचारपूस केली.