यवतमाळ : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये यातील 875 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.
आरोग्य पर्यवेक्षक – २
आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – ५९
आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – १००
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] -३१५
औषध निर्माण अधिकारी – १५
कंत्राटी ग्रामसेवक – १६१
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) – ४५
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – २
कनिष्ठ लेखा अधिकारी – २
कनिष्ठ सहाय्यक – ५१
कनिष्ठ सहाय्यक लेखा – १३
जोडारी – १
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३
रिगमन (दोरखंडवाला) – १
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १
लघुलेखक (निम्न श्रेणी) – १
वरिष्ठ सहाय्यक – ३
वरिष्ठ सहाय्यक लेखा – ६
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – १४
पशुधन पर्यवेक्षक – ३६
विस्तार अधिकारी (कृषि) – ५
विस्तार अधिकारी (पंचायत) -२
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) – १८
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ३
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – १६
एकूण – 875