धाराशिव ( उस्मानाबाद ) : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 34 जिल्यांमधील भरती प्रक्रिया शनिवारपासून झाली आहे. एकूण तब्बल 19, 460 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये यातील 453 जागांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे
पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे
आरोग्य पर्यवेक्षक – १
आरोग्य सेवक (पुरुष) 40% – १४
आरोग्य सेवक (पुरूष) 50% – ९७
आरोग्य सेवक (महिला) – १७८
औषध निर्माण अधिकारी -१३
कंत्राटी ग्रामसेवक – ३३
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/प्रा.पा.पु.) – २९
कनिष्ठ आरेखक – ३
कनिष्ठ लेखाधिकारी – १
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – २०
तारतंत्री – १
कनिष्ठ सहाय्यक लेखा – ४
अंगणवाडी पर्यवेक्षिका – १
रिगमन (दोरखंडवाला) – १
लघुलेखक (निम्न श्रेणी) – १
पशुधन पर्यवेक्षक (बिगर पेसा) -१०
यांत्रिकी – १
वरिष्ठ सहाय्यक लेखा – ७
विस्तार अधिकारी (कृषि) – १
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ३३
एकूण – ४५३
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे. हा फॉर्म भरताना खुल्या वर्गासाठी 1000 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रूपये इतकं आहे.