जालना : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती सुरू आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या जागा एकूण 19 हजार 460 इतक्या जागा आहेत. सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण 5 ऑगस्टपासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. यामधील जालना जिल्हा परिषदेसाठी 467 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे.
पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – १८२
औषध निर्माण अधिकारी – १२
कंत्राटी ग्रामसेवक – ५०
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा -२३
आरोग्य पर्यवेक्षक – १
आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – ४२
आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – १०९
कनिष्ठ लेखा अधिकारी – २
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) -१२
कनिष्ठ सहाय्यक लेखा – ५
पर्यवेक्षिका – ७
पशुधन पर्यवेक्षक – ४
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -१
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १
लघुलेखक (निम्न श्रेणी) – १
वरिष्ठ सहाय्यक लेखा -४
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) – १
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ३
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) – ७
एकूण – ४६७
जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.