Stock Market Holiday : शेअर बाजाराला कधी सुट्टी? कोणत्या दिवशी ट्रेडिंग बंद

| Updated on: Aug 09, 2023 | 7:21 PM

Stock Market Holiday : बीएसईच्या सुट्यांच्या यादीनुसार 15 ऑगस्ट रोजी इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेराईवेटिव्स सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही.

Stock Market Holiday : शेअर बाजाराला कधी सुट्टी? कोणत्या दिवशी ट्रेडिंग बंद
Follow us on

नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिना सुरु होऊन आता दहा दिवस होत आहे. या महिन्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रता दिवस (Independence Day) आहे. या महिन्यात रक्षाबंधनाचा सण आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना या महिन्यात किती दिवस शेअर बाजार बंद राहिल असा प्रश्न पडला आहे. सुट्यांच्या दिवशी शेअर बाजारातील कामकाज बंद असेल. स्टॉक मार्केटमध्ये या वर्षी 2023 मध्ये एकूण किती सुट्या आहेत. कोणत्या दिवशी कामकाज बंद असेल, याची यादी पूर्वीच जाहीर असते. बीएसईच्या संकेतस्थळावर सुट्यांची यादी जाहीर करण्यात येते. त्यानुसार, शनिवार-रविवारी बाजार बंद असतो. पण इतर सण, उत्सव, राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी बाजाराला सुट्या (Holiday) असतात.

या वर्षांत किती सुट्या

बीएसईच्या सुट्यांच्या यादीनुसार 15 ऑगस्ट रोजी इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेराईवेटिव्स सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. या वर्षी 2023 मध्ये एकूण किती सुट्या आहेत. कोणत्या दिवशी कामकाज बंद असेल, याची यादी पूर्वीच जाहीर असते. या वर्षभरात एकूण 15 दिवस सुट्या जाहीर आहेत. या दिवशी कोणतेही कामकाज होत नाही.

हे सुद्धा वाचा

15 ऑगस्ट रोजी बँकांना सुट्टी

बीएसईच्या संकेतस्थळावर सुट्यांची यादी उपलब्ध आहे. त्यानुसार, 15 ऑगस्ट, 2023 रोजी म्हणजे मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही. स्वातंत्र्य दिवस असल्याने शेअर बाजार बंद असेल. शेअर बाजारात शनिवारी वा रविवारी कामकाज होत नाही. बीएसईच्या हॉलीडे कॅलेंडरनुसार, या महिन्यात शेअर बाजारात शनिवार आणि रविवारासोबतच 15 ऑगस्ट रोजी सुट्टी असेल. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये कामकाज सुरु असेल.

या सेगेमेंटमध्ये ट्रेडिंग नाही

बीएसईवरील सुट्यांच्या यादीनुसार, 15 ऑगस्टनुसार इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेराईवेटिव्स सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. स्वातंत्र्य दिनीच्या निमित्ताने सर्वच सेगमेंट बंद असतील. कमोडिटी डेराईवेटिव्स सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट सेगमेंटमध्ये पण या दिवशी कामकाज होणार नाही.

या दिवशी शेअर बाजार बंद

26 जानेवारी, प्रजासत्ताक दिवस , 7 मार्च, होळी, 30 मार्च, राम नवमी, 4 एप्रिल, महावीर जयंती, 7 एप्रिल, गुड फ्राईडे, 14 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे, महाराष्ट्र दिवस, 29 जून, बकरी ईद या सुट्यांच्या दिवशी बाजार बंद होता.

या दिवशी कामकाज नाही

  1. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन
  2. 19 सप्टेंबर, गणेश चतुर्थी
  3. 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती
  4. 24 ऑक्टोबर, दसरा
  5. 14 नोव्हेंबर, दिवळी, बळी प्रतिपदा
  6. 27 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती
  7. 25 डिसेंबर, नाताळ, ख्रिसमस