Petrol Diesel Price Hike | तेल कंपन्यांनी तोटा भरुन काढण्यासाठीचे उत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशात आज मंगळवारी, 2 ऑगस्ट 2022 रोजी पेट्रोल डिझेल दरवाढ केली आहे. सध्या राज्यात पेट्रोल डिझेलचे दरात(Petrol-Diesel Rate Today) किरकोळ वाढ झाली आहे. पण लवकरच तुमच्या खिश्याला झळ बसू शकते . इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडला (IOCL) पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर अनुक्रमे 10 रूपये आणि 14 रुपये प्रति लिटर तोटा झाला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने पहिल्यांदाच तोट्याची (Loss) नोंद केली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात. IOC, BPCL आणि HPCL या सरकारी मालकीच्या (Government) तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी दिवाळीनंतर इंधन दरात कुठलाही बदल केला नव्हता. तोटा होत असताना ही या कंपन्यांनी दरवाढ रोखून धरली होती. उत्तर प्रदेशासह इतर काही राज्यांच्या निवडणूका (Election) पार पाडल्यानंतर कंपन्यांनी धडाक्यात दरवाढ केली. मार्च ते एप्रिल या महिन्यात कंपन्यांनी तब्बल 14 वेळा दरवाढ केली.आता तोटा भरुन काढण्यासाठी कंपन्या ग्राहकांच्या खिश्यात हात घालतील. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची (Inflation) झळ लागण्याची दाट शक्यता आहे.
मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरात इंधन दरवाढ करण्यात आली. त्यात वाराणसी, आग्रा, कानपूर, बरेली, प्रयागराज या शहरातील पेट्रोल-डिझेल किंमतीत(Petrol-Diesel Rate) वाढ करण्यात आली आहे. तर इतर अनेक शहरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत स्थिर आहेत.
राज्याची राजधानी मुंबईत मंगळवारी पेट्रोलचे दर 105.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमती 94.27 रुपये प्रति लिटर आहे. तर नवी मुंबईत पेट्रोलचे दर 106.42 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 94.38 रुपये प्रति लिटर आहेत. तर पुणे शहरात आज पेट्रोलचे दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमती 94.48 रुपयांहून 94.51 रुपये प्रति लिटर झाली आहे. नागपूर शहरात आज पेट्रोलचे भाव 106.06 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 92.61 रुपयांहून 92.75 रुपये प्रति लिटर झाले आहेत. नाशिकमध्ये आज पेट्रोलचे दर 106.77 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 93.27 रुपयांहून 92.73 रुपये प्रति लिटर झाले आहेत. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर 106.55 प्रति लिटर आणि डिझेलचे भाव 93.08 रुपयांहून 93.28 रुपये प्रति लिटर झाले आहेत. औरंगाबाद शहरात पेट्रोलचे दर 107.98 रुपयांहून 108 रुपये प्रति लिटर झाले आहेत. तर डिझेलचे भाव 95.94 रुपयांहून 95.96 रुपये प्रति लिटर झाले आहेत.
जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे. दर 15 दिवसांनी त्यात बदल केला जात असे. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. तर ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दरही सरकारच ठरवत होते. मात्र 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने ही जबाबदारी कंपन्यांच्या खाद्यावर टाकली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आदी गोष्टींआधारे तेल कंपन्या इंधन दर ठरवतात. पण दर ठरवण्याच्या प्रक्रियेवर अप्रत्यक्षरित्या सरकारचेच नियंत्रण असते हे अनेकदा समोर आले आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज SMS द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या (IOC) ग्राहकांना RSP<डीलर कोड> टाकून 9224992249 या क्रमांकावर तर एचपीसीएल (HPCL) ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवावा . बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP<डीलर कोड> असे लिहून 9223112222 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर लागलीच तुम्हाला तुमच्या शहरातील आजचे इंधन दर मिळतील.