Gold Reserve : हा देश म्हणजे सोन्याची जणू लंकाच! भारतापेक्षा दहा पट अधिक खजिना

| Updated on: Aug 17, 2023 | 3:29 PM

Gold Reserve : एका अंदाजानुसार भारतीयांकडे जवळपास 25,000 टन सोने आहे. जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. पण सरकारी खजिन्यातील आकड्यानुसार, भारत जगातील 9 वा देश आहे. जगातील सर्वात अगोदर कोणता देश आहे.

Gold Reserve : हा देश म्हणजे सोन्याची जणू लंकाच! भारतापेक्षा दहा पट अधिक खजिना
Follow us on

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : भारतीयांचे सुवर्णवेड जगाला माहिती आहे. पण जगात सोन्याची सर्वाधीक विक्री चीनमध्ये (Gold Import in China) होते. त्यानंतर आयातीत भारतीयांचा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील या देशात सोन्याचे भंडार आहे. हा देश जणू सोन्याची लंकाच आहे. लंका कधीकाळी सोन्याची होती असे म्हणतात. या देशाच्या तिजोरीत पण कोट्यवधींचे सोने आहे. एका अंदाजानुसार भारतीय लोकांकडे सर्वाधिक सोने आहे. जवळपास 25,000 टन सोने भारतीयांकडे आहे. पण अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार, तिजोरीतील सोन्याआधारे भारत सोन्याचा साठा (Gold Reserve) करणारा जगातील 9 वा देश आहे. जगात या देशाकडे सर्वाधिक सोने आहे.

कोणता आहे हा देश

हे सुद्धा वाचा

अर्थातच हा देश अमेरिका आहे. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेकडे सरकारी खजिन्यात 8,133 टन सोने आहे. या बाबतीत जगातील एकही देश अमेरिकेच्या जवळपास नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे. या देशाच्या केंद्रीय बँकेच्या खजिन्यात 3,355 टन सोने आहे. भारत जगातील गोल्ड रिझर्व्हच्या टॉप 10 देशांमध्ये सहभागी आहे.

कोणत्या देशाकडे किती सोने

World of Statistics नुसार सोन्याचा साठा असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इटली हा देश आहे. या युरोपियन देशाकडे सर्वाधिक 2,452 टन गोल्ड रिझर्व्ह आहे. फ्रान्सकडे 2,437 टन गोल्ड आहे. तो यादीत पाचव्या स्थानावर आहे. रशियाकडे 2,330 टन सोने आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाने इतर देशात ठेवलेले सोने माघारी बोलावले.

चीनचा क्रमांक कितवा

जगातील दुसरी अर्थसत्ता असलेला चीन या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या देशाच्या केंद्रीय बँकेकडे 2,113 टन सोने आहे. युरोपातील सर्वात छोटा देश स्वित्झर्लंडकडे 1,040 टन सोने आहे. या यादीत पुढचा क्रमांक जपानचा लागतो. जपान सध्या जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानकडे 846 टन गोल्ड रिझर्व्ह आहे.

भारताकडे किती आहे सोने

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षांत सोने खरेदीचा सपाटा लावला. 2017 पासून सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. भारताच्या केंद्रीय बँकेकडे 797 मेट्रिक टन सोने आहे. सोने खरेदीत भारताने अशात अजून आघाडी घेतली आहे. या यादीत 10 व्या स्थानी नेदरलँड आहे. नेंदरलँडच्या डच नॅशनल बँकेकडे 612.45 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.

इतर देश कोणते

तुर्की (440 टन), तैवान (424 टन), पुर्तगाल (383 टन), उजबेकिस्तान (377 टन), सौदी अरब (323 टन) आणि कझाकिस्तान (314 टन) यांचा क्रमांक लागतो. सध्या आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या पाकिस्तानकडे 64.66 टन सोने आहे. भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत 12 पट अधिक सोने आहे. तर व्हेनेझुएलाकडे 161 टन सोने आहे.