मुंबई : आज रिलायन्स इंडस्ट्रीच्या 46 व्या एजीएममध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोड घडल्या आहेत. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डावरुन राजीनामा दिला आहे. आता त्यांच्याजागी ईशा अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरआयएल बोर्डाने संचालक मंडळावर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डामधून बाहेर पडल्या आहेत. पण त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेयरपर्सन पदावर कायम राहणार आहेत.
दरम्यान मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. येत्या 19 सप्टेंबरला गणेश चर्तुर्थीच्या दिवशी रिलायन्स जियो फायबर लॉन्च होणार आहे. मुकेश अंबानी यांनी ही आज घोषणा केली.
किती लाख कोटींचा झाला रिलायन्सचा रिटेल बिझनेस
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलबद्दल सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती दिली. रिलायन्स रिटेलच व्हॅल्यूएशन 2020 मध्ये 4.28 लाख कोटी रुपये होतं. ते वाढून आता, 8.28 लाख कोटी रुपये झालय. रिलायन्स रिटेलने वित्त वर्ष 2023 मध्ये 2,60,364 कोटी रुपयांचा रेवेन्यू मिळवला.
रिलायन्स रिटेलच नेट प्रॉफिट किती हजार कोटी?
कंपनीचा एबिटडा 17,928 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट 9,181 कोटी रुपये आहे. रिलायन्स रिटेल ग्लोबल टॉप 100 मध्ये एकमात्र भारतीय रिटेलर आहे. जगात वेगाने वाढणाऱ्या रिटेलर्सपैकी एक आहे अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.