मुंबईः कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मैत्री (Friendship in Office) करावी की नाही, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेकांचे अनुभव याबाबतीत वेगवेगळे असतात. विशेषतः कॉर्पोरेट ऑफिसमध्ये (Corporate office) सर्वांशी फक्त औपचारिकपणे वागावे. फार खरेपणाने मैत्री करू नये, जास्त भावनिक (Emotional) होऊन वैयक्तिक गोष्टी शेअर करू नये, असे म्हटले जाते. फक्त कामाशी काम ठेवावे, आपल्या कामाशी प्रामाणिक रहावे… असे केले तरच आपण टिकून राहतो, असा सल्ला अनेकदा दिला जातो. याच विषयावर एका IAS अधिकाऱ्याची पोस्ट वेगाने व्हायरल होतेय.
सोशल मीडियावर ऑफिसमधील मैत्री या विषयावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली. त्यावरून नेटकऱ्यांना तुमचं मत काय असं विचारलंय?
अवनीश शरण यांनी लिहिलंय, ‘Not Everyone At Your Workplace Is Your Friend… DO Your Job, Get Paid…Go Home… म्हणजेच ऑफिसमध्ये कुणीही तुमचा मित्र नसतो.
फक्त आपलं आपलं काम करा. पगार घ्या आणि घरी जा… हस्ताक्षरात लिहिलेल्या या वाक्याचा फोटो अधिकाऱ्याने शेअर केलाय आणि यूझर्सना सहमत आहात की नाही, असा प्रश्न विचारलाय.
Agree or Not ? pic.twitter.com/VjOVJJB0i2
— Awanish Sharan (@AwanishSharan) November 15, 2022
काही तासातच हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अनेकांनी या वाक्याला सहमती दर्शवली. बहुतांश लोकांनी ही गोष्ट सत्य असल्याचं म्हटलंय.
एका यूझरने मात्र या गोष्टीला विरोध दर्शवलाय. या वाक्याशी मी सहमत नाही. कारण ऑफिस हे आपलं दुसरं घर असतं…
तर एका यूझरने आणखी वेगळी प्रतिक्रिया दिली. नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत माझे काही मित्र झाले होते. पण मागील १८ वर्षात ऑफिसमध्ये माझा कुणीही मित्र झाला नाही.
आणखी एका यूझरने म्हटलंय, या वाक्याशी मी सहमत आहे. कारण सहकाऱ्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि मैत्रीची भावना होते. पण परिस्थितीनुसार स्पर्धा, इर्श्या, उपहास, निंदा, चुगल्या आदी गोष्टी जोडल्या जातात.
तर एका यूझरने लिहिलंय… मी सहमत नाही. सामाजातील विविध संस्थांमुळे आपण सामाजिक बनलो आहोत. त्यामुळे एवढं प्रोफेशनल वागू शकत नाहीत.