Hot Property Deal : एका अपार्टमेंटसाठी मोजले इतके कोटी रुपये! मुंबईतील महागडा फ्लॅट

| Updated on: Aug 24, 2023 | 4:50 PM

Hot Property Deal : मुंबईतील ओबेरॉय 360 वेस्ट या टोलेजंग इमारतीत 6,779 चौरस फुट अपार्टमेंटचा भाव ऐकून कोणालाच विश्वास बसणार नाही. पण हा फ्लॅट इतक्या कोटी रुपयांना विकल्या गेला आहे. ही सदनिका इतक्या उंचीवर आहे की तुम्हाला ढगांशी गप्पा मारता येईल.

Hot Property Deal : एका अपार्टमेंटसाठी मोजले इतके कोटी रुपये! मुंबईतील महागडा फ्लॅट
Follow us on

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : देशाच्या आर्थिक राजधानीत कोट्यवधी, अब्जावधीच नाही तर त्यापेक्षा मोठमोठ्या डील होणे ही काही नवीन गोष्ट नाही. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक घडामोडींचे हे केंद्र आहे. मुंबईतील मालमत्तांचे भाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. मुख्य मुंबईत आलिशान सदनिका खरेदी करणे हे सर्वसामान्यच काय भल्याभल्या श्रीमंतांसाठी, काही अपवाद वगळता दिवा स्वप्नच आहे. मुंबईत अशाच एका महागड्या मालमत्तेची (Hot Property Deal) विक्री झाली आहे. ओबेरॉय 360 वेस्ट या टोलेजंग इमारतीत 6,779 चौरस फुट सदनिकेचा भाव ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल. गुंतवणूक करणारी कंपनी वेस्ट ब्रिज कॅपिटलचे (West Bridge Capital) सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीर चढ्ढा (Sumir Chadha) यांनी ही महागडी मालमत्ता स्वतःच्या नावावर केली आहे. त्यासाठी त्यांनी 3.59 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकार दरबारी जमा केली आहे.

ढगांशी मनसोक्त गप्पा

तर या सदनिकेचा आकार 6,779 चौरस फुट आहे. मुंबईतील वरळी भागात ही अपार्टमेंट आहे. हा फ्लॅट 60 व्या मजल्यावर आहे. ही मालमत्ता त्यांनी ओबेरॉय रिअॅल्टी लिमिटेड यांच्याकडून खरेदी केला आहे. त्यासाठी 3.59 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी जमा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या आठवड्यात झाली रजिस्ट्री

या फ्लॅटची रजिस्ट्री 18 ऑगस्ट 2023 रोजी झाली. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 7,459 चौरस फुट तर कारपेट एरिया 6,799 चौरस फुट आहे. हा प्रकल्प Oasis Realty ने तयार केला आहे. Oasis Realty चे सुधाकर शेट्टी आणि ओबेरॉय रिअल्टीचे विक्री ओबेरॉय यांचे हे जॉईंट व्हेंचर आहे. या फ्लॅटमधून अरबी समुद्र दूरपर्यंत पाहता येणार आहे. या इमारतीत 4BHK आणि 5BHK फ्लॅटस तयार करण्यात आले आहे.

इतक्या कोटीत केली खरेदी

गुंतवणूक करणारी कंपनी वेस्ट ब्रिज कॅपिटलचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीर चढ्ढा यांनी ही हॉट प्रॉपर्टी खरेदी केली आहे. त्यांनी 96 कोटी रुपयांत ही मालमत्ता खरेदी केली आहे. ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडने या सदनिकेची विक्री केली. त्यासाठी 3.59 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे.

360 का ठेवण्यात आले नाव

या इमारतीची उंची 360 मीटर असल्याने आणि हे अपार्टमेंट पश्चिम बाजूला असल्याने याचे नाव 360 West असे ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. या मार्च महिन्यात अवनीर कॅपिटल आणि बजाज कन्सल्टेंट्सने या प्रकल्पात 100 कोटी रुपयांचा डुप्लेक्स खरेदी केले आहे.