Ganpati Festival Expensive | कोरोनाचे (Covid-19) विघ्न निवळल्यानंतर पहिल्यांदाचा विघ्नहराचे (Ganpati Bappa) स्वागत करण्यासाठी आतूर असलेल्या गणेशभक्तांना यंदा महागाईचा (Inflation) सामाना करावा लागणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवासाठी खरेदीची लगबग सुरु होणारा आहे. पण यंदा जीएसटीसोबतच (GST)वाढलेल्या किंमतीमुळे गणेश भक्तांना खर्च कुठे कमी करु? असा प्रश्न पडणार आहे. गणेश मुर्तीपासून ते सर्व पूजा साहित्य (Worship Materials) यंदा महागात मिळणार आहे. पूजा साहित्याच्या दरात यंदा 25 टक्क्यांची वाढ झाल्याने सर्वच साहित्य महागात मिळणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचे बजेट तर कोलमडणारच आहे, पण त्यांचा हिरमोड ही होणार आहे.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा दणक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचे बेत भक्तांनी आखला आहे. गणपती मुर्तींपासून तर पुजेच्या साहित्यांनी बाजारापेठा सजल्या आहेत. आकर्षक आणि सुबक गणेश मुर्तींचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. त्यासोबतच मखर, सजावटीचे साहित्य, रोषणाई, पूजा साहित्यात कापूर, उद, अगरबत्ती, वाती, फुलवाती, विद्युतमाळा, पाट, चौरंग आणि इतर साहित्याची दुकाने आता चौकात-चौकात थाटली जात आहेत. यंदा जल्लोषात श्रींचं आगमन करण्यासाठी गणेशभक्तही सज्ज झाले आहेत, पण त्यांच्या आनंदावर महागाई पाणी फेरणार असे चित्र आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न आले आहे. कापरचा दर पाव किलोमागे 150 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे किलोच्या दरात मिळणारा कापूर यंदा त्याच भावात एक पाव नेता येणार आहे. गेल्यावर्षी एक किलो कापूर 750 ते 800 रुपये दराने मिळत होता. यंदा एक किलो कापूरासाठी भाविकांना 2000 रुपये मोजावा लागणार आहे. कापूरावर 18 टक्के जीएसटी लावल्याने भाव वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अगरबत्तीचे दरातही वाढ झाली आहे. अगरबत्तीचे दर 500 रुपयांवरुन 1000 रुपये किलो झाले आहेत. अगरबत्तीवर 12 टक्के जीएसटी लागू होतो. गेल्या वर्षी अगरबत्तीचा पुडा 300 ते 400 रुपयांना मिळत होता. यंदा तो 500 ते 600 रुपयांना मिळत आहे. वातीचे पाकीट यंदा 10 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला मिळू शकते. तर गणेशवस्त्र आणि इतर वस्तूंच्या किंमतींसाठी ही भक्तांना जादा रक्कम मोजावी लागणार आहे.
गणेश मूर्ती महाग असली तरी विधिवत पुजेसाठी मूर्ती लागते. दुसरीकडे पूजेचे साहित्य ही गरजेचे असल्याने गणेशभक्त खर्चात कुठे कपात करावी या विचारात सापडेल आहेत. त्यांना खर्चात कपात करण्यासाठी यंदा जास्त कसरत करावी लागणार आहे. त्यातच काही भक्तांनी पीओपी मूर्ती न वापरण्याचा निर्णय घेतल्याने मातीपासून मूर्ती तयार करण्याचा विचार करत आहेत. शाडू माती सुद्धा महाग असल्याने यंदा गणेश भक्तांसमोर महागाईचे विघ्न उभे ठाकले आहे.