एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) ची मालकी मिळवल्यानंतर व्यवहाराची रक्कम अदा करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आवाहन करताच जगातील दिग्गज मस्क यांच्या मदतीला धावले आहे. या मित्रांच्या गोतावळ्यातून मस्क यांनी थोडी-थोडीकी नव्हे तर सुमारे 7.1 अब्ज डॉलर्सची नवीन वित्तपुरवठा वचनबद्धता मिळविली आहे, मस्कसाठी धावून आलेल्या दिग्गजात अब्जाधीश लॅरी एलिसन (Larry Ellison), एक सौदी प्रिन्स (Saudi Prince) आणि सेकोइया कॅपिटल (Sequoia Capital) यांचा समावेश आहे, अजूनही अनेक जण मस्कच्या सोबत आहे. मते, विचार मांडण्याचे स्वातंत्र व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या ट्विटरचे अधिग्रहण करण्यासाठी मस्क यांना 44 अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. या मोठ्या गुंतवणुकदारांच्या मदतीने मस्क हा व्यवहार पूर्ण करुतील असा बाजारातील अभ्यासकांचा अंदाज आहे.
माहिती तंत्रज्ञानातील या सर्वात मोठ्या कंपनीच्या अधिग्रहणासाठी टेस्लातील 19 गुंतवणुकदारांनी मस्क यांना मोठ्या भांडवली आर्थिक निधीसाठी पुढाकार घेतला आहे. मस्क यांनी सुरुवातीला असे म्हटले होते की, टेस्ला या इलेक्ट्रिक-व्हेइकल कंपनीतील त्यांच्या शेअर्सच्या तुलनेत 12.5 अब्ज डॉलर्सच्या कर्जासह त्यांनी या करारासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.
या नव्याने निधी उभारणीमुळे मस्क यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार निम्म्यावर आला आहे, तो एकूण कर्जाच्या निम्म्या आकाराने घटून 6.25 अब्ज डॉलर्सपर्यंत मजल मारता येईल आणि त्यामुळे मस्क आणि त्यांचे देणीदार या दोघांसाठीही हा करार कमी जोखमीचा होईल. आता उर्वरीत रक्कम मस्क यांना स्वतःच उभारावी लागणार आहे. सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची योजना आखली आहे.
किंगडम होल्डिंग कंपनीच्या मंडळाचे अध्यक्ष आणि सऊदी राजपुत्र अल्वलीद बिन तलाल ,मस्क यांच्या अधिग्रहणानंतर ट्विटर कंपनीतील हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी 1.9 अब्ज डॉलर्स किंमतीचे सुमारे 35 दशलक्ष शेअर्स टिकविण्यास सहमती दर्शविणारे सर्वात मोठे योगदानकर्ते ठरले आहे. सिक्युरिटीज् फाईलिंग कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. ओरॅकल कोर्पचे सहभागीदार इलिसन जे टेस्ला कंपनीतील समभागधारक आहे, त्यांनी ही त्यांच्या संस्थेतून मस्क यांना 1 अब्ज डॉलर देण्याचे जाहीर केले आहे.
गुरुवारी गुंतवणुकदारांच्या यादीत इतर गुंतवणूकदारांमध्ये जगातील सर्वात मोठी क्रिप्टो एक्सचेंज, बिनन्स होल्डिंग्ज लिमिटेड, ब्रूकफील्ड असेट मॅनेजमेंट, फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि कतार होल्डिंग यांचा समावेश आहे
मस्कच्या ट्विटर बोलीला पाठिंबा दर्शविणार् यांमध्ये टेस्लाचे अनेक गुंतवणूकदार आहेत, ज्यात कार निर्मात्याच्या 1.45% शेअर्सची मालकी असलेल्या एलिसन आणि फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी यांचा समावेश आहे. त्यांची टेस्लातील मालकी सुमारे 1% आहे. दोघेही टेस्लाच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. छोट्या गुंतवणूकदारांमध्ये विटकॉफ कॅपिटल, रिअल इस्टेट-समर्थित कार्यालय आणि कार्टेना कॅपिटल या माजी मिलेनियम मॅनेजमेंट पोर्टफोलिओचे मॅनेजर पीटर एव्हेलोन यांनी स्थापन केलेला हेज फंड यांचा समावेश आहे.