OLA Electric : स्वस्तात मस्त राईड! OLA ची MoveOS 4 स्वातंत्र्य दिनी बाजारात

| Updated on: Aug 13, 2023 | 6:31 PM

OLA Electric : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी OLA ची MoveOS 4 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहे. नवीन फीचर्स असलेल्या या स्कूटरची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती.

OLA Electric : स्वस्तात मस्त राईड! OLA ची MoveOS 4 स्वातंत्र्य दिनी बाजारात
Follow us on

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : ओला इलेक्ट्रिक (OLA Electric) आता स्वातंत्र्य दिनी (Independence Day) बाजारात दाखल होत आहे. OLA ची MoveOS 4 नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. 15 ऑगस्ट रोजी नवीन Ola इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटरवरचा पडदा हटणार आहे. बेंगळुरुच्या या कंपनीची OLA S1 Air ही स्कूटर बाजारात येऊ घातली आहे. ही स्कूटर बाजारात धुमाकूळ घालेल असा एक्सपर्टचा दावा आहे. गेल्या वर्षी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरने प्री-लाँच बुकिंग सुरू केल्याच्या अवघ्या 24 तासांत 1 लाखांचं बुकिंग नोंदवलं होतं. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भवेश यांनी सोशल मीडियावर यांनी याविषयीचा टीझर टाकला.

ओला स्कूटर स्वस्तात

ओला कंपनीची एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्यात येणार आहे. 28 जुलै 2023 रोजीपासून ही स्कूटर बाजारात दाखल होत आहे. ग्राहकांना सवलतीत ही स्कूटर खरेदी करता येईल. त्यासाठी 30 जुलै 2023 रोजीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

ओला इलेक्ट्रिक बाईक

यापूर्वी ओला इलेक्ट्रिक बाईकचे टीझर दिसून आले होते. पण त्यात फीचरविषयी फार माहिती समोर आली नव्हती. MoveOS 4 अपडेट फीचर मिळतील. सध्याच्या फीचरपेक्षा त्यात अनेक अपडेट आले आहेत. कॉन्सर्ट मोडमध्ये बदल पाहायला मिळेल. डिजिटल डिस्प्लेमध्ये मूड ऑप्शन जोडल्या जाऊ शकतो. सध्या लाईट, ऑटो आणि डार्क सेटिंग्स असे पर्याय समोर येऊ शकतात.

ओला मॅप्स

ओला इलेक्ट्रिक ओला मॅप्स वर काम करत आहे. त्यामुळे संभावित नॅव्हिगेशन टूल वर काम करत आहे. त्यासाठी मॅप्सचे काम सुरु आहे. या फीचरमुळे रस्त्यावरील चार्जिंग स्टेशन शोधण्यास वाहनधारकांना मोठी मदत होईल.  त्यांना चार्जिंग स्टेशन शोधण्यास फार वेळ लागणार नाही.

इलेक्ट्रिक स्कूटरची फीचर

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मूव्ह ओएस4, Ola S1 चे मॉडिफाईड व्हर्जन आहे. स्कूटरच्या सॉफ्टवेअरमध्ये बडा अपडेट करण्यात आला आहे. यामध्ये हाय-डेफिनेएशन टचस्क्रीन डिस्प्ले आणि इतर अनेक अपडेट देण्यात येऊ शकते. टचस्क्रीनवर रायडर्स फिल्मे, म्युझिक व्हिडिओ आणि टीव्ही शो पाहू शकतात.

बाजारात हे स्पर्धक

ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड आहे. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन रायडिंग मोड आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोनो-शॉकचा वापर नाही. तर पुढील चाकामध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील चाकात ट्विन-शॉक एब्जॉर्बर असेल. बाजारात हिरो ऑप्टिमा, ओकिनावा प्रेज प्रो या सारख्या इलेक्ट्रिक स्क्टूरशी स्पर्धा करेल.