रायपूर : लोकांना वाटते शेतीत फायदा नाही. परंतु, असं काही नाही. शास्त्रिय पद्धतीने शेती केल्यास शेतकरी करोडो रुपये कमाऊ शकतात. यासाठी कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. असं काहीतरी वेगळं करून दाखवलं आहे छत्तीसगडच्या शेतकऱ्याने. ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे सत्य आहे. छत्तीसगडचा हा शेतकरी लाखो नव्हे तर करोडो रुपये कमवत आहे. या शेतकऱ्याकडे महागड्या गाड्या आहेत. आता हेलिकॅप्टर खरेदी करणार आहे.
या शेतकऱ्याचे नाव राजाराम त्रिपाठी आहे. ते आपल्या कुटुंबासह बस्तर जिल्ह्यात राहतात. नक्षलप्रभावित भागात ते शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरले आहेत. ते काळी मिर्ची आणि पांढऱ्या मुसळीची शेती करतात. आता त्यांनी ७ कोटी रुपयांचे हेलिकॅप्टर घेण्याची तयारी दाखवली आहे. ते हेलिकॅप्टरने आपल्या शेताची पाहणी करतील.
राजाराम त्रिपाठी उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे मूळ रहिवासी. परंतु, त्यांचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून छत्तीसगडच्या बस्तरमध्ये राहते. त्यांना शेतीसाठी कित्तेक पुरस्कार मिळाले आहेत. राजाराम कोडागाव आणि जगदपूर जिल्ह्यात काळी मिर्ची आणि पांढऱ्या मुसळीची शेती करतात.
राजाराम त्रिपाठी यांची हेलिकॅप्टर खरेदीसाठी हॉलंडच्या कंपनीसोबत डील झाली. ते आर ४४ मॉडलचे ४ सिटवाला हेलिकॅप्टर खरेदी करणार आहेत. या हेलिकॅप्टरने ते शेतीचे निरीक्षण करतील. गरजेनुसार औषधाची फवारणी करतील. राजाराम त्रिपाठी यांनी १ हजार शेतकऱ्यांचा गृप तयार केला आहे. त्यांच्यासोबत सुमारे ४०० आदिवासी जुळले आहेत.
राजाराम त्रिपाठी यांची आई दंतेश्वरी हर्बल गृपची सीईओ आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न २५ कोटी रुपये आहे. दंतेश्वरी यांचे हर्बल गृप अमेरिका आणि युरोपमध्ये काळी मिर्ची पाठवते. यामुळे राजाराम त्रिपाठी हे काळी मिर्चीची शेती करतात. या शेतीतून निघालेले उत्पन्न ते परदेशात चांगल्या किंमतीत विकतात.