इंदापूरमध्ये लाईट शिवाय मोटार चालते, शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी

| Updated on: Aug 27, 2023 | 1:01 PM

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी होत आहे.

इंदापूरमध्ये लाईट शिवाय मोटार चालते, शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी
Agricultural news in marathi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेतीशी (farmer news) संबंधित असल्यामुळे अधिक व्हायरल झाला आहे. शेतीची (Agricultural news in marathi) कामं हलकी करण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या पद्धतीने जुगाड करतात. तसे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शेतकऱ्यांची काम सोपी व्हावीत किंवा कमी वेळेत व्हावीत यासाठी शेतकरी अधिक धडपड करीत असतो. काही शेतकऱ्यांनी अशा गोष्टी तयार केल्या आहेत की, लोक त्यांच्याकडं त्या गोष्टी पाहायला जातात.खरतर लोकांना शेतकऱ्यांनी केलेला जुगाड अधिक आवडतो.

व्हिडीओमध्ये काय आहे

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये शेतकरी पॅटर्न, आम्ही इंदापूरकर लाईट शिवाय मोटार चालू एक नवा प्रयत्न असं लिहीलं आहे. एक तरुण तिथं ठेवलेलं इंजिन हाताने सुरु करीत आहे. लाईट शिवाय त्यांनी जुगाड करुन मोटार सुरु होत असल्याचं व्हिडीओत दाखवलं आहे. व्हिडीओ एक मोटार, एक बॅटरी असं साहित्य सुरुवातीला दिसत आहे. एकदा मोटार सुरु झाल्यानंतर मोटारमधून पाणी सुरु झालं आहे. त्यावेळी तिथं असलेल्या बोर्डमध्ये पटकन लाईट लागल्या आहे. मशीनच्या बाजूला एक मोठा बोर्ड ठेवण्यात आला आहे. त्याला १५ बल्ब आहेत. ते सगळे सुरु झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

 

पाणी थेट एका मशिनवरती पाडलं आहे

जे पाणी मोटारमधून बाहेर आलं आहे. ते पाणी थेट एका मशिनवरती पाडलं आहे. त्यामुळे पुढशी मशीन गतीने गोल फिरत आहे. खाली पडलेलं सगळं बाजूच्या शेतात जात आहे. स्पीडचं पाणी लाईट तयार करीत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओला एक मराठी गाणं लावण्यात आलं आहे. त्याचबरोबर जुगाड करण्यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे हे सुध्दा व्हिडीओत दाखवण्यातं आलं आहे.