Farmer News Maharashtra : मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी

| Updated on: Aug 28, 2023 | 3:28 PM

Farmer News : जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड आणि पेरणी केली होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गायब झालेल्या पावसामुळे पीक करपायला सुरुवात झाली आहे.

Farmer News Maharashtra : मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी
Farmer News Maharashtra
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महाराष्ट्र : धाराशिव (Usmanabad) जिल्ह्यात पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त (Farmer News Maharashtra) झाला आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. धाराशिव तालुक्यातील बावी येथील राठोड कुटुंबीय आपल्या शेतातील लावलेली मिरची वाचवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यातून पिकांना पाणी पाजत आहेत. विशेष म्हणजे बाटलीने पाणी घालून मिरची (chilli crop destroyed) वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. थोड्याशा पाण्याने पिकांना नक्कीचं दिलासा मिळेल. परंतु यापुढे पाऊस नाही झालातर शेतकऱ्यांचं जीवन अवघड असेल असं चित्र दिसत आहे.

हळद पिकावर पांढरे चट्टे, शेतकरी चिंतेत

नांदेडमध्ये हळद या पिकावर पांढरे चट्टे पडायला सुरुवात झाली असून त्यामुळं पानाला छिद्र पडत आहेत. त्या रोगामुळं हळद पिकाची वाढ बऱ्यापैकी खुंटली आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये चिंता देखील पसरली आहे. नेमका हा कोणता रोग आहे याबाबत शेतकऱ्यांना अद्याप कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. जिल्हा कृषी विभागाने या बाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात हळदीवर या अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हे सुद्धा वाचा

परभणी जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

परभणी जिल्ह्यात 28 टक्के कमी पाऊस आतापर्यंत झालेला आहे. परभणी जिल्ह्यात यंदा उशिरा मान्सून दाखल झाला आहे. त्याचा पिकांवर परिणाम होणार असल्याची त्यावेळी चर्चा होती. त्यातचं भर पावसाळ्यात वीस दिवस पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली खुंटली आहे. त्यामुळे सगळ्या पिकांचं उत्पादन कमी होणार आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे धरणाची स्थिती ही अजिबात समाधानकारक नाही अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

बीड जिल्ह्यातील काळेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकं पाण्यावाचून सुकायला लागली आहेत. पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. सोयाबीन पीकं हे सुकत चालले आहे. शेतकऱ्यांसमोर पिकाला पाणी देण्याचं संकट उभं टाकलं आहे.

निफाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेती पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. लासलगाव जवळ असलेल्या विंचूर येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे तिथं असलेल्या विहीरींनी सुध्दा तळ गाठल्यामुळे रेनगनच्या साह्याने सोयाबीन पिकाला पाणी देऊन पीक वाचवण्याची धडपड सुरू आहे.