Inflation | म्हंजे पैसा खर्चच करायचा नाय का? फिक्स ठेवला तर 6% व्याज अन् खरेदीवर 18% जीएसटी, नेटकऱ्यांकडून सडकून टीका!

Reaction against Inflation News | द्यायेच पाच आणि वसूल करायचे 100, सातत्याने वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यांनी याविरोधातल्या संतापाला सोशल मीडियावर वाट मोकळी करुन दिली आहे.

Inflation | म्हंजे पैसा खर्चच करायचा नाय का? फिक्स ठेवला तर 6% व्याज अन् खरेदीवर 18% जीएसटी, नेटकऱ्यांकडून सडकून टीका!
समाज माध्यमांवर संतापाला वाट मोकळी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 5:10 PM

Reaction against Inflation | तर मंडळी महागाईला (Inflation) सर्वसामान्य नागरिक, काबाडकष्ट करणारा वर्ग जाम वैतागला आहे. कष्टकरी (working class)जनतेला तर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतोय. तर मध्यमवर्ग तर या प्रकारावर संताप व्यक्त करत आहे. जिथे संधी मिळेल तिथे तो तुटून पडत आहे. एकीकडे महागाई वाढवायची आणि दुसरीकडे ती कमी केल्याचा ढिंढोरा पिटवायचा या प्रकाराविरोधात समाज माध्यमांवर (Social Media) संताप आणि संताप व्यक्त होत आहे. सरकार मुळावरच उठल्याची तीव्र भावना समाजमनात घट्ट होत आहे. सरकारच्या धोरणांविरोधात (Government Policy) ते रोष व्यक्त करत आहेत. सरकारी धोरणामुळे घरचं बजेट केव्हाच कोलमडलं आहे. आता जगण्यासाठीची रोजची कसरत करावी लागत आहे. सरकार दखल घेत नसल्याने या वर्गाने समाज माध्यमांवर रोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारला जात आहे. द्यायचे पाच आणि खिश्यातून काढायचे 100 अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

समाज माध्यमांवर पूर

समाज माध्यमांवर नेटिझिन्सने सरकारच्या धोरणांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. सरकारचे धोरण हेच महागाईला पूरक आणि जनतेला मारक असल्याचा सूर उमटत आहे. सोशल मीडियावर या धोरणांविरोधात कॉमेंट्सचा पूरच आला आहे. प्रत्येक जण महागाईने जनतेचे कसे नुकसान होत आहे. किती नुकसान होत याचे पाढे वाचू लागला आहे. याविषयीच्या अनेक पोस्टस सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. प्रचंड भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे फटकारे समाज माध्यमातून उमटत आहेत. लोकांच्या क्रिएटिव्हिटीला उधान आले असून जो तो महागाई वाढवण्याला कारणीभूत धोरणांवर तोंडसूख घेत आहेत.

महागाईचा दंडम

सरकारकडून सातत्याने पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरु होती. त्यात मध्यंतरी रोष वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या करात सरकारने कपात केली. मात्र तरीही किंमती या पूर्वीच्या किंमतींपेक्षा 20 ते 30 रुपयांनी महागच आहेत. दुसरीकडे 500 रुपयांच्या घरात मिळणारे गॅस सिलिंडर तर आता थेट 1000 रुपयांच्या पुढे सरकल्याने मध्यमवर्ग प्रचंड हैराण झाला आहे. एवढंच कमी होत की काय म्हणून सरकारने खाद्यान्न आणि अन्नधान्यावर अटी व शर्तींसह 5 टक्के जीएसटी लावण्याचा घेतलेला निर्णय महागाईला खतपाणी घालण्यासाठी सहायक ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हायरल झालेली महागाईविरोधातील वाक्य

  1. सरकार खाल्या मीठाला जागणारे नाही. त्यांनी पीठालाही सोडले नाही. त्यावरही टॅक्स लावला.
  2. आता मरणार ही महागले. सरकारने अंत्यविधीच्या सामानावर कर लावला
  3. वाढवायचे 100 आणि कमी करायेच 5, बस्स की राव, आता किती येड्यात काढणार
  4. भांडवलदारांचे कर्ज माफ आणि हिसकावता आमच्या तोंडचा घास
  5. ठेवीवर 6 टक्के व्याज नी पॅकबंद पीठावर 12 टक्के जीएसटी, वारे सरकार
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.