Gold Prices Fall | ऑफर सोन्याहून पिवळी मंडळी, सोने 16 महिन्यात सर्वात स्वस्त, आता खरेदीदारांच्या पडणार उड्या

Gold Rate fall | डॉलरने मोठी मजल मारल्याने रुपयापाठोपाठ सोन्याने दम तोडला आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोने गेल्या 16 महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात स्वस्त झाले आहे.

Gold Prices Fall | ऑफर सोन्याहून पिवळी मंडळी, सोने 16 महिन्यात सर्वात स्वस्त, आता खरेदीदारांच्या पडणार उड्या
सोन्यात गुंतवणुकीची सोन्यासारखी संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 10:44 AM

Gold Rate fall News | डॉलरने (dollar) मोठी मजल मारल्याने रुपयापाठोपाठ (Rupee) सोन्याच्या किंमतींनी (Gold Price News) दम तोडला आहे. डॉलर 20 वर्षांतील उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या गंगाजळीत (treasury) गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक उत्पन्न आले आहे. जगभरात आर्थिक मंदीच्या (Economic recession) भीतीनंतरही सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. सर्वसाधारणपणे मंदी, युद्ध आदी संकट आले की सोन्याचे दर वाढतात, पण यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. डॉलर दिवसागणिक मजबूत होण्याचा हा परिणाम आहे. सोने गेल्या 16 महिन्यांत पहिल्यांदाच सर्वात स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याचे दर कमालीचे घसरल्याने भारतीय बाजारपेठांमध्ये ही त्याचा परिणाम दिसून आला. सोन्याचे भावात गेल्या दीड वर्षानंतर कमालीची घसरण दिसून आली. याच कारणामुळे सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परताव्याचा परंपरागत पर्याय गुंतवणुकदारांना खुणावत आहे. सोने कमी किंमतीत मिळत असल्याने गुंतवणुकदारांच्या (Investors) त्यावर उड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत.

जागतिक बाजारातील स्थिती

जागतिक बाजारात आज सोने 0.5 टक्क्यांनी घसरून 1,687.29 डॉलर प्रति औंस झाले. ऑगस्ट 2021 च्या सुरुवातीपासून सोन्याची ही नीचांकी पातळी आहे. त्याचबरोबर अमेरिकेत सोन्याच्या वायदे बाजारातील भाव 0.6 टक्क्यांनी घसरला आणि तो 1,687.30 डॉलर प्रति औंस झाला. सोन्याबरोबरच चांदीचे भावही वेगाने खाली आले आहेत. जागतिक बाजारात स्पॉट चांदीचे दर (Spot Silver Prices News) 0.9 टक्क्यांनी घसरून 18.49 डॉलर प्रति औंस झाले आहेत. प्लॅटिनमचे दरही (Platinum Prices News) 0.7 टक्क्यांनी घसरून 852.14 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. परंतू, पॅलेडियमच्या किंमतीत (Palladium Prices) किंचित वाढ झाली आणि ते 0.1 टक्क्यांनी वाढून 1,863.47 डॉलर प्रति औंसवर पोहोचले

सोन्याला ग्रहण कशामुळे ?

गेल्या काही काळापासून अमेरिकन डॉलर चढतीच्या मार्गावर आहे. डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या उच्चांकी पातळी लवकरच गाठणार आहे. तर अमेरिकन गंगाजळीत गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न आलं आहे. गुंतवणूकदारांसमोर सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय समोर आला आहे. शेअर बाजारातील पडझड पाहता सोन्यातील चांगला परतावा त्यांना खूणावत आहे. सोन्याच्या किंमतीत अजूनही कमी येण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमध्ये फेडरल रिझर्व्हचे योगदान असून, फेडरल रिझर्व्हने पुढील आठवड्यात होणाऱ्या धोरणात्मक बैठकीत एका झटक्यात व्याजदरात 0.75 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

देशांतर्गत बाजारात सोने झाले इतके स्वस्त

देशांतर्गत बाजारात, आयबीजेएच्या(IBJA) माहितीनुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोने 371 रुपयांनी घसरून 50,182 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे 23 कॅरेट सोने 49,981 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. आज 22 कॅरेट सोनं 45,967 रुपये, 18 कॅरेट सोनं 37,637 रुपये आणि 14 कॅरेट सोनं 29,356 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. 2021 पासून सोन्याचा हा सर्वात कमी भाव आहे. आज देशांतर्गत सराफा बाजारात चांदी 630 रुपयांनी घसरून 54,737 रुपयांवर आली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.