Dilip Vengsarkar | ऋतुराज गायकवाडवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या वसीम जाफरला वेंगसरकरांच सडेतोड प्रत्युत्तर

| Updated on: Jun 27, 2023 | 2:41 PM

Dilip Vengsarkar : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची मागच्या आठवड्यात निवड झाली. यात कसोटी संघाची निवड वादग्रस्त ठरली आहे. अनेकांनी टीम इंडियाच्या टेस्ट टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

Dilip Vengsarkar | ऋतुराज गायकवाडवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या वसीम जाफरला वेंगसरकरांच सडेतोड प्रत्युत्तर
Dilip Vengsarkars-Ruturaj gaikwad-wasim Jaffer
Follow us on

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मागच्या आठवड्यात टीम इंडियाची निवड जाहीर झाली. कसोटी संघाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटुंनी आक्षेप नोंदवले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील खराब प्रदर्शनामुळे चेतेश्वर पुजाराला टीममध्ये स्थान टिकवता आलं नाही. त्यानंतर अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी फेरनिवड. त्याने 16 महिन्यानंतर WTC फायनलसाठी निवडलेल्या टीममध्ये स्थान मिळवलं.

सर्फराज खान आणि अभिमन्यू ईश्वरन यांची टीममध्ये निवड न होणं हा तिसरा निर्णय वादग्रस्त ठरला. कारण देशांतर्गत आणि रणजी ट्रॉफीमध्ये दोघेही खोऱ्याने धावा करत आहेत. पण, तरीही निवड समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

दोन निवडीवर प्रश्नचिन्ह

आयपीएल 2023 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांची कसोटी संघात निवड झाली. या दोन निवडींवर काही माजी क्रिकेटपटुंना प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. दिलीप वेंगसरकर यांनी ऋतुराज गायकवाडच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “फॉर्मेट कुठलाही असो, खेळाडूंवर दबाव सारखचा असतो. त्यांनी टीकाकारांना थोडं थांबण्याची विनंती केली आहे. टेस्ट फॉर्मेमध्ये गायकवाड कसा परफॉर्म करतो, ते पाहा” असं दिलीप वेंगसरकरांनी म्हटलय.

वसीम जाफर काय म्हणाले ?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी ऋतुराज गायकवाडच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या ईश्वरन आणि पांचाळला डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ऋतुराज गायकवाड झेप घेऊन टेस्ट टीममध्ये कसा आला? हा त्यांचा मुद्दा होता. आयपीएलमुळे हे सर्व झालं असं त्यांना म्हणायच होतं. त्यांनी टि्वट करुन ऋतुराज गायकवाडच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.


दिलीप वेंगसरकर काय म्हणाले?

“रेड बॉल किंवा व्हाइट बॉल फरक पडत नाही. सगळच सारखं आहे. चांगला प्लेयर सगळ्याच फॉरमॅटमध्ये सामावला जातो. ऋतुराज कसा परफॉर्म करतो, ते पाहण्यासाठी आपल्याला थोंड थांबाव लागेल. आणि हा रांगेचा विषय काय आहे? मला समजत नाही. प्रत्येक प्लेयर दावेदार आहे” असं दिलीप वेंगसरकर म्हणाले.

ऋतुराज गायकवाड मर्यादीत ओव्हरच्या क्रिकेटमध्ये खेळला आहे. अजून तो स्वत:च टीममध्ये पक्क स्थान निर्माण करु शकलेला नाही. गायकवाड टी 20 क्रिकेटसाठी जास्त ओळखला जातो. मुंबईच्या यशस्वी जैस्वालची सुद्धा टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे.